Skip to main content

गवसणी.(चारोळ्या)

लेखक प्रल्हाद दुधाळ. यांनी शुक्रवार, 27/03/2015 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
गवसणी.(चारोळ्या) शिकविलेस स्वाभिमानी जगणे, माणुसकीने जिंकण्याचा ध्यास... संकटातही आई शोधेन संधी, घालेन गवसणी मी गगनास..!! प्रीती तुझी ही संजीवनी मजला, अर्थ नव्याने आला या जगण्यास.... साथीने या जीवन मंगल गाणे, घालेन गवसणी मी गगनास..!! मांडला डाव वारंवार मोडला हिरावला आलेला तोंडाशी घास... लढाई जगण्याची पुन्हा नव्याने घालेन गवसणी मी गगनास..!! माणसांना अनुभवले इतके, समृद्ध समर्थ केले जीवनास.... साथीत जगतो समरसतेने, घालेन गवसणी मी गगनास..!! ......प्रल्हाद दुधाळ
लेखनविषय:

वाचने 1601
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छान आहे. लेखनासाठी शुभेच्छा. आईच्या प्रेमाबाबत प्रीती असा शब्द यापूर्वी वाचल्याचं स्मरत नाही. प्रेम, माया, भक्ती, ममता असे शब्द आठवतात.

मांडला डाव वारंवार मोडला हिरावला आलेला तोंडाशी घास...
अप्रतिम शब्द रचना