मग कळेल मझा...!
तू काही माझं ऐकणार नाहीस
मीही आपला हट्ट सोडणार नाही...
तू घरात बसून....
बायकोच्या हातची भजी खात,
समाजातल्या विकृतींवर बोलणार...
वातानुकुलीत सभांमध्ये भाषणे ठोकणार
जमलंच तर झणझणीत कविता पाडणार
मला नाहीच रे जमणार...
तुझं हे तळ्यात - मळ्यात खेळायला
आत एक अन बाहेर एक जमवायला
आपलं कसं सारं एकदम सडेतोड असणार
आम्ही प्रत्येक प्रसंगाला थेट शिंगावर घेणार
नाही रे जमत मला असं जगणं
हे असं..., कौलातून झिरपणार्या..
थेंबभर कवडशांच्या मागे धावणं...
केव्हातरी उंबरठ्याबाहेर पाऊल टाक
चटके देणारं लखलखीत उन्ह अंगावर घे...
मग कळेल मझा...
बेभान होवून जगण्यातला
'मी'ला विसरून स्वतःलाच उधळून देण्यातला !
विशाल
मिसळपाव
फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात.
समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर;
तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम.
पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ.