Skip to main content

नेता व्हायचंय एका रात्रीत ?

लेखक संजुदा यांनी रविवार, 26/04/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
नेता व्हायचंय एका रात्रीत ? पूर्वीच्या काळी अनेक वर्षांच्या समाजसेवेनंतर नेते तयार होत असत. आता जमाना बदललाय. जीवन गतिमान झालंय. डिजिटल युग आलंय. आता डिजिटल बॅनरमधून नेते तयार व्हायला लागलेत. तुम्हाला नेता व्हायची इच्छा असेल तर अलिकडे ते फारच सोपं काम झालं आहे. नेता व्हायचंय एका रात्रीत ? दाखवून टाक झलक चौकाचौकात लाव पोरा शुभेच्छांचे फलक घरादारात गल्लीबोळात जरी नसेल तुला स्थान फलकावरती लिहून टाक युवकांचे आशास्थान वडील नेहमीच ओरडत असतात दाखव काही तरी कर्तृत्व हरकत काय रे लिहायला शहराचं खंबीर नेतृत्व ? वाढेल वलय नेतृत्वाचे मिळेल तिथे खाता खाता होऊन जाशील बेट्या एक दिवस
काव्यरस

हेल्मेट

लेखक संजुदा यांनी रविवार, 26/04/2015 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती त्यावेळी लिहिलेली ही कविता 'हेल्मेट 'वर कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांनी जर कविता लिहिली असती तर कदाचित ती अशीच लिहिली असती . विडंबनाचा एक प्रयत्न 'हेल्मेट' पाडगांवकरांच्या शैलीत हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून त्याला कवच म्हणता येतं हिंदीतून त्याला शिरस्त्राण म्हणता येतं हेल्मेट हेच त्याचं दुसरं नेम असतं हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं हेल्मेटच्या सक्तीचा सरकारी कायदा आहे खरं तर हेल्मेटचा आपल्यालाच फायदा आहे एकदा डोक्यात घातलं की हेल्मेट झपाट्या

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 26/04/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला

स्वच्छंद - १

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 26/04/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
शहरात राहात असूनही सुदैवाने सकाळ उजाडते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. बुलबुलची साद, दयाळचा सूर, इवल्याश्या सनबर्डसचा चिवचिवाट, तांबटाचा टिकटिकाट, देवकावळ्याचे घुमणे, किंगफिशरचा किर्किरात, चिमण्यांची चिवचिव आणि सर्वांवर टिपेला जाणारा पोपटांचा कलकलाट. तसे पोपट पूर्वीपासूनच आहेत पण गेल्या पाच एक वर्षात त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. निलगिरी, सुबाभुळ, शेकट, सोनमोहर अशा अनेक झाडांवर ही मंडळी वावरताना दिसतात. एकाने साद घालायची, तिघा चौघांनी प्रतिसाद द्यायचा, मग सर्वांनी कलकलाट करायचा आणि मग एकसमयाव्च्छेदेकरुन सर्वांनी थव्याने उडुन जायचे हा नित्यक्रम. पक्षी हा मुक्त व स्वच्छंद विहरतानाच छान दिसतो.

डि. एस. एल. आर कॅमेरा कसा निवडावा ?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 26/04/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मागे मिपावर ह्यावर एक धागा आला होता. पण तो मिळत नाहिये. शिवाय त्यात बरेच उलट सुलट सल्ले होते, त्यामुळे माझा गोंधळ अजुनच वाढला.म्हणुन परत हा धागा प्रकार- हौशी छायाचित्रकार/ बिगिनर फोटो-इन्डोअर्/आउटडोअर बजेट-३०-४० हजार एक उदाहरण म्हणजे, समजा मी आय.टी. वाला असल्याने मला कोणी विचारले की चांगला लॅपटॉप कोणता घेउ? तर मी सांगेन की कमीतकमी ४ ते ८ जी.बी. रॅम, ५०० जी.बी./१टि.बी. हार्ड डिस्क,इंटेल आय ५ प्रोसेसर (ए. एम.डी नको), १५.७ इंच स्क्रीन असे कॉन्फिगरेशन घे. शक्यतोलेनोवो ,डेल किंवा लेनोवोचा लॅपटॉप घे.एसर नको. तर असा काहीतरी सल्ला हवाय. आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत. धन्यवाद.

तू ये...

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 26/04/2015 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन तू ये, तुला फुकट देईन... वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन तू ये, तुला फुकट देईन... अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन तू ये, तुला फुकट देईन... अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन तू ये, तुला फुकट देईन...
काव्यरस

एका नाटकाचा दुर्दैवी अंत

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 26/04/2015 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास ३० एक वर्षांपूर्वीची गोष्ट. हौशी कलाकार मंडळीचे नाटक मंचावर सुरु होते. बैठीकीच्या खोलीचे दृश्य होते. मंचावर सोफासेट, सेंटर टेबल इत्यादी वस्तू होत्या. अभिनयात दंग असलेला नायकाचा पाय कुठल्या तरी वस्तुत अटकला आणि तो धाडकन सेंटर टेबल वर आपटला. कपाळावर चार टाके आले, अर्थातच नाटक अर्ध्यावरच संपले. मंडळी हौशी होती, तालिमी करताना मंचावर ठेवलेल्या वस्तूंचा विचार केला नव्हता. जर तो विचार केला असता, तर नाटक अर्ध्यावर संपले नसते. सिनेमात आपण पहिले आहे, दुष्ट खलनायक, नायकांच्या आप्तांना अधिकांश वेळी नायिकेला फासावर लटकवतो, नायिका तडफडू लागते.