सफर तामिळनाडुची! - भाग १
माझं न नवर्याचं एक तत्व आहे.. समजा पैसे असतीलच.. तर माणसानी दुनिया पहावी.. बावळट सारखं घराला डेकोरेटच करणं, इंटीरियरच करणं ह्या सारख्या क्षुद्र गोष्टींवर पैसे घालवु नयेत.. आता ह्या वाक्यातली मुदलातली "समजा पैसे असतीलच तर.." हीच अट पुर्ण होत नसल्याने आम्ही पुढच्या भागाकडे कधी वळलोच नाही..! पण तरी वर्षातुन एकदा "कुठे तरी जायला हवं राव" नावाचा किडा वळवळतो..आणि मग लोक कसं ऋण काढुन सण साजरा करतात.. तसं आम्ही ऋण काढुन भटकायला जातो..! तसंही पैसा नाही म्हणुन कुरकुरायचय.. असंही कुरकुरायचय..
मिसळपाव