राणीच्या देशात - व्हिटबी अॅबी - एक विलक्षण अनुभव
मे महिन्याच्या पहिल्या लाँग विकांताला मित्र-परिवारासोबत चार दिवस कॅरावॅन हॉलिडे करुन आले. शेफिल्डपासून अडिच तासाच्या अंतरावर फिली म्हणून कॅरावॅन पार्क आहे तिथे असंख्य स्टॅटिक कॅरावॅन्स, टेंट्स, मोटरहोम्स पार्क करण्याची सुविधा आहे. तर चार दिवसाच्या मुक्कामात जवळपास काय प्रेक्षणीय स्थळे आहेत हे बघायचे ठरवले, जणेकरुन बाहेर फिरणं ही होईल आणि वॅनमध्ये वेळही घालवता येईल. फिलीपासून १०-१५ मिनिटाच्या अंतरावर स्कारबराह बीच आहे त्याचे नॉर्थ बे आणि साऊथ बे असे दोन बीचेस आहेत. तो आमचा आवडता बीच, अनेक वेळा तिथे गेलोय पण नवीन अजून काय बघायचे असे चालले होते.
मिसळपाव
