आंतरजालीय संस्थळावर अहमहमिका लागली होती शतशब्दकथा लिहायची ….सगळेजण शब्दांवर तुटून पडत होते.…
तो मात्र येणारी प्रत्येक कथा वाचण्याआधी अधाशासारखे शब्द मोजत होता सोनारासारखा तोलूनमापून… ह्या प्रकारात कधी नव्हे ते शब्दांना किती मोल असते आणि शिवाय अर्थही ….
त्याच्या मनात विचार चमकला अचानक …. बायकोला सुद्धा हीच अट घालायला हवी रोज… दिवसाला फक्त शंभरच शब्द …. बास …ह्या वाफेच्या किटलीमुळे त्याचे कान किटले होते…तिच्या तोंडातून निघणाऱ्या वाफेने रोज भाजून निघायचा हा खरपूस कोंबडीसारखा…. येता जाता फक्त आणि फक्त अवहेलना…
मनाचा हिय्या करून उभा राहिला बायकोसमोर…. पण तोंडातून शब्दच फुटेना काही केल्या….