श्रावण विशेषात मोडणारी आणि श्रावणातच मिळणारी एक चविष्ट भाजी.अतिशय कमी साहित्य हा हिचा गुणविशेष.पांढरी भेंडी म्हणायला पण पिस्ता कलरची असणारी ही भेंडी.
यात अजून प्रकार असतात ते म्हणजे नऊधारी किंवा सातधारी भेंडी.एरवी पंचकोनी असलेली भेंडी चक्क सप्तकोनी,नवकोनी असतात.या भाजी साठी नेहमीची हिरवीगार भेंडीपण वापरता येतात.पण खरी चव खुलते ती श्रावणातल्या भेंडीसोबत.ही ती भेंडी.
माझ्या आईची मैत्रीण श्रीमती भानुमती पाटकर हिच्या सी.के.पी. घरात होणारी ही भाजी. भानूमावशीकडे शिकलेली भाजी करण्याआधीच तिची आठवण ही भेंडी दिसली येतेच. आता माझ्याही स्वयंपाकघरातली कमी वेळात न कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे,त्यामुळेही आवडती भाजी आहे.
खास करून कांदा,लसूणन वापरायच्या दिवशी ही भाजी म्हणजे मेजवानीच.तुम्हालाही आवडेलच याची खात्री आहेच.बघाच करून.
भाजीसाठी लागणारे साहित्य पाहू.
साहित्य:-
१. १० पांढरी किंवा सातधारी भेंडी.(मी पांढरी वापरली आहेत.)
२. १ वाटी ओले खोबरे.(शक्यतो ताजे खवलेले).
३. सहा ते सात हिरव्या मिरच्या.(आवडीनुसार जास्त घ्यायला हरकत नाही.)
४. अर्धी वाटी कोथिंबीर
५. १ वाटी ताजे सायीचे घट्ट दही.
६. १ चहाचा चमचा साजूक तूप.
७. अर्धा चहाचा चमचा जिरे.
८. मीठ चवीनुसार.
९. १ चहाचा चमचा साखर.
कृती:-
१. भेंडी धुऊन पुसून दोन तुकडे करून,प्रत्येक तुकड्याला एका बाजूने चीर द्यावी.
२. खोबरे, मिरच्या, कोथिंम्बीर, मीठ, साखर याचे वाटण अर्धे दही घालून पाणी न घालता करावे.
थोडे पातळच होते.
३. भेंड्यात वाटण भरून घ्यावे.
४. नॉनस्टिक पसरट पॅनमध्ये तूप घालून जिऱ्याची फोडणी करावी.
५. भेंडे पसरून लावावे,शक्यतो एकच थर लावावा.
६. उरलेल्या वाटणात उरलेले दही मिसळून भेंड्यांवर पसरावे.
७. वर झाकण ठेऊन ५/७ मिनिटे शिजवावे.
८. झाकण काढून भेंडी उलटावीत.
९. आता झाकण न ठेवता भाजीला सुटलेले पाणी आटेपर्यंत शिजवावे.मस्त खरपूस होतात.
आता पुढे काय ते सांगायची गरज आहे का?वरण भातासोबत फन्ना उडवावा.
वाचने
19942
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह! भेंडी कोणत्याही प्रकारात
वा वा!मस्तच!
छान पाकृ
भेडी.....
तळलेली भेंडी ची रेसिपी द्या
In reply to भेडी..... by मुक्त विहारि
नविन मस्त प्रकार तै :)
In reply to तळलेली भेंडी ची रेसिपी द्या by स्रुजा
काही काही फोटो ब्लर झालेत.
जावू द्या हो.......
In reply to काही काही फोटो ब्लर झालेत. by सूड
आता उद्या भेंडी आणणे आलेच.
भेंडी नुसती आणून भागत नाही.....
In reply to आता उद्या भेंडी आणणे आलेच. by स्नेहानिकेत
उद्यापासुन भेंडी महाग
छान पाकृ!
सुरंगी ताई, आता काय भारी
भेंडीची रेशिपी उद्याच करते!!!
मी पण करते अशीच पण दही नाही
वाह ! मस्तंच रेसिपी !
आंबट दह्यातच रेसिपी जास्त
In reply to वाह ! मस्तंच रेसिपी ! by पगला गजोधर
पांढरी भेंडी ,
पगला गाजोधरजी,जास्त आंबट दही
वाह
मस्त पाकृ!
मस्त...
भेंड्याचे प्रकार
जागुताई दे ग रेसेपी.. बरेच
In reply to भेंड्याचे प्रकार by जागु
चालेल देते हळू हळू. एकदम
In reply to जागुताई दे ग रेसेपी.. बरेच by विशाखा राऊत
अजुन एक...
In reply to भेंड्याचे प्रकार by जागु
आमच्या मेसमध्ये होणारा आवडता
In reply to अजुन एक... by पगला गजोधर
एकदा करुन बघावे लागेल आता...
पाणी आल तोंडाला. आज सकाळीच
दही भेंडी / रायता पाककृती
ते "प्रकार दुसरा" चं बघा
खुप छान!
मस्त् च
वाखु साठवतो. (भेंडी)-जेपी