Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] सुगंधी हातरूमाल

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 10/08/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
"शरद ४१ वर्षाचा मला सोडून गेला.ती रात्र मला खूपच भयानक वाटली.सकाळी बेडवर शरद दिसला नाही.त्याच्या उशी खाली सुगंध लावलेला त्याचा हातरुमाल दिसला.

[शतशब्दकथा स्पर्धा]: प्रतिबिंब

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 10/08/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
अनुने हळुच समोरच्या आरशात पाहीले. आरशात तिच्याबरोबरच आणखी तीन माणसे पाठमोरी उभी होती. ते तिघेही पलंगावर झोपलेल्या अभिकडे पाहात काहीतरी बोलत होते. ती स्त्री म्हणत होती, "अशोक, अरे दिसत तर कोणीच नाहीये पलंगावर? पण मग मघाशी कुणाचातरी धक्का लागला. उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळले. मी उठुन पाहीलं तर तु झोपला होतास शांतपणे..माझ्याकडे पाठ करुन ! त्याक्षणी अनुने मागे वळुन पलंगावर झोपलेल्या अभीकडे पाहीले. पलंगावर इतर कोणीही नव्हते. आता आरशात फ़क्त ती तीन माणसेच दिसत होती. ते तिघेही वळुन आरशाकडे पाहायला लागले होते.

[शतशब्दकथा स्पर्धा] डिझाईन

लेखक पिलीयन रायडर यांनी सोमवार, 10/08/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
आई ग्ग!! लाथा मारतो की गम्मत करतो हा? फुटबॉल खेळणार नक्की कार्टा.." ती पोटाकडे पहात कौतुकाने म्हणाली. तो मस्तपैकी हसला.. ~ "बाई, तुमच्या मुलाची ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.." "....." "घाबरू नका. तो पुर्ण बरा होईल." "फुटबॉल खेळेल?" दाराआडुन त्याने चटकन डोळे पुसले.. ~ डोळे उघडत नाही, दुध पित नाही, टिचकी मारली तरी रडत नाही. ती तिचं पिल्लु कणाकणानी मरताना बघत होती.. तो... डॉक्टरांमागे पळत होता.. ~ "ऑपरेशन तर झालं, पण धोका टळलेला नाही." डॉक्टर म्हणाले.. नळ्यांमध्ये वेढलेल्या व्हेंटीलेटरवरच्या जीवाला पाहुन तिने आवंढा गिळला. तो गप्पच होता.. दोन दिवस.. ~ "आई...

माझे व्यायामाचे फ़ंडे- २

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 10/08/2015 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझे व्यायामाचे फंडे - २ (कृपया वाचकांनी लेखाच्या तांत्रिक बाबींकडे न पाहता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा, ही विनंती आहे.) आमच्याच शहरातील महानगरपालिकेच्या हॉलमध्ये ही योगासने शिकवली जात होती. योगासनासारख्या आरोग्याशी निगडित गोष्टीसाठी नेमका महानगरपालिकेचा हॉल कसा काय मिळतो कुणास ठाऊक? त्यात भरीस भर म्हणून नेमका हा योगासनाचा वर्ग भाजी मंडईत होता. तिथे असणारी स्वच्छतागॄहे खूपच अस्वच्छ होती. योगासने करताना कधी कांद्याचा तर कधी ढब्बू मिरचीचा, कधी आंब्याचा तर कधी फणसाचा.. सीझनप्रमाणे वेगवेगळे वास येत होते.

[शतशब्दकथा स्पर्धा] बळ

लेखक कानडा यांनी सोमवार, 10/08/2015 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
तो: माझ्या दोघींनी माझी साथ सोडलिये. आता तुलाही मी माझ्या बंधनातून मुक्त करतो. ती: त्यांनी साथ सोडली म्हणुन काय झाले. माझी आहे ना. तो: गुण जुळत नाहीत गं. तु तरी काय पाप केलय की ही शिक्षा भोगावी? आपल्या मागे कुणी नाही. मग सुटल्यावर तु तरी सुखी राहशील ना. ती: अरे सावली कधी साथ सोडत नसते. तो: आता संपुर्ण आयुष्य अंधारातच जाणार आहे. ती: मी अर्धांगिनी आहे तुझी. आणि मी असतांना कसला अंधार? आता असला काही विचार करु नकोस. जोवर आहे तोवर मी तुझ्या सोबतच आहे. तो: कुठुन आणते गं इतके बळ? ती: तुझ्या आशिर्वादातुन- फक्त इतकाच दे - "अखंड सौभाग्यवती भवः!"

दाल पराठा

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 09/08/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
उरलेली शिळी आमटि, दाल फ्राय किंवा दाल तडकाचा ब्येस्ट सदुपयोग! paratha 1 साहित्यः १. तुर, मसुर आणि मुग डाळ - प्रत्येकि पाव वाटि छोटि २. तेल - ३ चमचे ३. आलं / लसूण पेस्ट - १ चमचा ४. जीरं, धणे आणि बडिशेप पावडर - १ छोटा चमचा प्रत्येकि ५. हळद / तिखट - पाव चमचा प्रत्येकि ६. बारीक चीरलेली हिरवी मिरची - चवीप्रमाणे ७. बारीक चीरलेला टोमॅटो - १ ८. बारीक चीरलेले कांदे - २ ९. बारीक चीरलेली कांद्याची पात (हिरवा भाग फक्त) १०.

गादी - शेवट

लेखक संजय पाटिल यांनी रविवार, 09/08/2015 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गादी - , , , चाचांचे मनोगत मागील भागापासून पुढे सुरू.... वेड्या वाकड्या झालेल्या बांगड्या हातात खेळवत खिडकीतून बाहेर शून्यात नजर लावून विचार करत बसलो होतो. कामगार काम उरकून निघून गेले होते. बेगम खाना बनवण्यात व्यस्त होती. कुणाच्या असतील बरं? कामगारानां खोदून खोदून विचारलं तरी सांगता येईन की नेमका कुठला कापूस किंवा कुठल्या गादीतून ह्या आल्या असतील.

पळसधरी (पुण्यनगरी) कट्टा वृतांत

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 09/08/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
(काट्याचा वृतांत लिहिणे हा प्रांत नसताना आणि अंगावर जबाबदारी पडून कसातरी लिहिला आहे , डॉक्टर ,मूवी , कंजूस आणि माप ह्यांनी अजून छायाचित्र क्षण चित्रे / किस्से जरूर टाकावेत) रविवारी सकाळी भल्या पाहते मऊ दुलईतून खिडकीबाहेर पाहिले अजूनही अंधारलेल होत पाउस अगदी कोसळत होता समोरचा येउरचा डोंगरही ढगात लोपला होता , परत मस्त ताणून देऊ का ह्या विचारात होतो इतक्यात लक्ष्यात आल अरे आज "पळसदरी कट्टा" , त्या तीन दिवस आधी डॉक्टर खरेंनी "काय आप्पा" कट्ट्यावर आमंत्रण दिल होत आणि त्यांना सांगूनही टाकल होत येतो म्हणून !!

[शतशब्दकथा स्पर्धा] नक्षत्राच देणं

लेखक जेपी यांनी रविवार, 09/08/2015 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
विठ्या भकास नजरेने आभाळाकड पहात बसला होता. सकाळी आभाळात दिसणारी ढगाची गर्दी, दुपारी जोरदार कुंभारी वार्‍या सोबत गायब व्हायची. शेजारी बसलेल्या तात्याकड पहात बोलला,"तात्या,अंऊदा बी काय खर दिसत नाय.संमदी नक्षत्र लागोपाठ कोरडी जाऊ लागल. जगायच कस माणसान.धुळपेरणी बि वाया गेली.पुना पेरणी करायची वेळ आली बग.काय डोस्क काम करना बग" कोरड्या भुईवर काडीन रेघा मारत बसलेला तात्या थरथरता हात डोळ्यावर धरत आभाळाकड पाहु लागला. अभाळात ढगाची गर्दी जमा होती,दुर कुठतरी विज पडल्याचा कडकडाट झाला. त्याच्या थरथरत्या हातावर आभाळातुन तुटणारी थेंब पडु लागली. तात्या हरकुन म्हणाला,"आरं पोरा,हे नक्षत्राच देणं हाय त्याच्या मर्ज

पर्वतावरील पुनर्जन्म- “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा अल्पपरिचय

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 09/08/2015 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
“बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा हा अल्पपरिचय: पर्वतावरील पुनर्जन्म पुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या मनीषचंद्र पांडे लिखित आणि पेंग्विन बुक्सतर्फे प्रकाशित मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रभाकर करंदीकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद “फिरुनी नवी जन्मले मी”, नुकताच प्रफुल्लता प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केलेला आहे.