जिन्नस
- २०० ग्रॅम वाटाण्याचे दाणे
- ४/५ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- आले-लसूण यांची पेस्ट
- जीरे, तेल, मीठ
- २५० ग्रॅम कणीक
- प्रथम वाटाण्याचे दाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर काढून घ्याव्यात.
- एका पॅन मध्ये २ चमचे तेल घेवून जीरे, आले-लसूण पेस्ट टाकावे.
- नंतर वाटाण्याचे जाडसर मिश्रण त्यात टाकावे. एक वाफ आणून घ्यावी.
- कणकेत मीठ टाकून नेहेमीच्या पोळीसारखे भिजवावे.
- कणकेचे गोळे करून वरील मिश्रण त्यात भरून पराठ्यासारखे लाटावे.
- तेल टाकून तांबूस रंग येईपर्यंत परठा शेकावा.
- सॉस किंवा चिंचेच्या चटणीसोबत अथवा दहीसोबत खायला द्यावा.
वाचने
7468
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
छायाचित्र टाका ओ. बाकी हा
मिपा वर स्वागत . तुमची ही पण
छान पाकृ.
ओला वाटणा आहे हे गृहीत धरतेय
मटारचे पराठे आवडतात :)
फोटू.........................
फोटो?
फोटो असायलाच हवा बरोबर ..
Kachorichi recipi sanga