Skip to main content

जीवनशाळा

लेखक कवि मनाचा यांनी मंगळवार, 01/03/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
गणिताच्या तासाला, उत्तर फारच सोपं असतं एक अधिक एक बरोबर दोनच असतं शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं इथे मात्र एक नि एक 'अकरा'च करावं लागतं. फळ्यावर सोडविली कितीशी किचकट समीकरणं लांबच लांब सूत्रांची कसली ती प्रकरणं यशाच्या पायऱ्या चढताच कळतं इथे मात्र एकच यावं लागतं 'बेरजेचं' राजकारणं. ते म्हणाले, आम्ही उंचावतो तुमच्या पिढीची बुद्धिमत्ता (IQ) मग का बरं खालावली आज समाजजीवनाची गुणवत्ता नोकरी-व्यवसायात उतरताच कळतं इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता. भौतिकशास्त्राच्या तासाला प्रश्नच कधी समजला नाही स्पिरीटचा दिवा, एबोनाईटचा दांडा अन् रेशमी रुमाल माझ्याशी असे का वागले तेच कधी कळलं नाही आज भौ

शब्दांची ताकद

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 01/03/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो.

दंगा कथा : छोटू

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 01/03/2016 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतिया खान असा शाळेत जाण्याचा मार्ग. शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा. रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३ किलोमीटर पाई चालण्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजयचेच. मोतिया खान जवळ एक चांभार होता. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याचा मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते.

जेएनयूतला अराज्यवाद (?)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/03/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे 9 फेब्रुवारी 2016 ला दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेची चित्रफित मी 10 फेब्रुवारीला पाहिली! विद्यार्थ्यांच्या देशाविरूध्द जोशातल्या घोषणा ऐकून खूप अस्वस्थ झालो. दुसर्‍ंया दिवशी विद्यार्थ्यांच्या बाजूने आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या- ऐकल्यात तर अजून चक्रावलो. हा काय प्रकार आहे? काय लिहावे. लिहू का नको वाटले. पण आत खदखदत राहिलो. 10 फेब्रुवारीला दाखवली गेलेली चित्रफित खोटी होती म्हणे. म्हणून सुधारीत 11 फेब्रुवारीला प्रसारीत केलेली चित्रफित पाहिली. घोषणांचा आशय तोच होता. जेएनयूतले काही विद्यार्थी बदलले तरी घोषणा भडकाऊ होत्याच.

तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सना पर्यायी आहार ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 01/03/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक नसलेले पर्यायी आहार कोणते ? मिपावरील आणि इतरत्रच्या सुयोग्य पाककृतींचे दुवे देणे आणि तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक टाळून समतोल आहार कसा घ्यावा ? हे या धागा लेखाचे मुख्य प्रश्न आहेत. तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक असले तर नुकसान काय असा कुणि तरी प्रश्न घेऊन येईलच तेव्हा त्याचेही उत्तर हवे आहे. तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्स, खोबरे, शेंगदाणे, तीळ, साबुदाणा, रताळे, बटाटे, इत्यादी पदार्थ भारतीयांच्या जिभेचे लाड पुरवतात त्यास जवाब नाही त्यामुळे त्यांच्या चविष्टतेच्या मुल्यावर या धाग्यावर बद्दल वाद करण्याची इच्छा नाही.

बसते बिचारी एकटी आजी -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 01/03/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
बसते बिचारी एकटी आजी देवापुढती वाती वळत असते मुखात नामस्मरण कधी तिचे ना कंटाळत.. गत आयुष्याचा पाढा असते स्वत:शीच उगाळत गालावर एखादा अश्रू नकळत येई ओघळत.. सोसले जे आयुष्यभरात जाईे डोळ्यासमोर तरळत वेग वाती वळण्याचाही जाई वाढत तसाच नकळत.. सखा जीवनातुन का गेला सोडून अर्ध्यावरुनी पळत आसवात का भिजती वाती जिणे रोजचे राहीे छळत.. .
काव्यरस

माहिती हवी - ठाणे परिसरात शास्त्रीय संगीत शिकवणी

लेखक उमेश पाटील यांनी मंगळवार, 01/03/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे पश्चिम परिसरात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी चांगला गुरु अथवा चांगली संस्था असल्यास सुचवावे, स्वानुभवावरून सुचविल्यास अगदी उत्तम सविस्तर माहिती : मला स्वतासाठी शिकवणी हवी आहे आणि आधी ३ वर्ष शास्त्रीय संगीतात शिक्षण घेतले आहे सध्या घराजवळच शिकवणी हवी असल्याने माहितीसाठी विनंती

ते...(पुढे सुरू!) भाग ३

लेखक सटक यांनी मंगळवार, 01/03/2016 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ निस्तेज डोळ्याच्या सवितेला काही सुचत नव्हते..आल्यापासून तिने फक्त २ लोटे पाणी रिचवले होते. तोंडातून एक शब्दही फुटला नव्हता. राघवला परशुरामशास्त्र्यांकडे येणार्‍या लोकांच्या स्थितीची कल्पना असल्याने तो शांतपणे स्वतःच्या आसनावर बसून होता. सवितेची नजर ठरत नव्हती एका ठिकाणी. अत्यंत कृश असलेली सविता कोणत्या तरी आत्यंतिक तणावाखाली आहे हे तर उघडच होते. फिक्कट, निस्तेज, कधीकाळी आनंदी असेल अशी शंकाही न येणारी सविता कुठले तरी अनामिक भय वागवित होती.

डाब चिंगडी (शहाळ्यात शिजवलेली कोळंबी)

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 01/03/2016 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण डाब चिंगडी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'डाब'म्हणजे शहाळे आणि 'चिंगडी'म्हणजे कोळंबी. शहाळ्यात शिजवलेली कोळंबी. साहित्यः शहाळे - २ कोळंबी - ५०० ग्रॅम कांदा - २ लांब चिरुन काजु - ७ - ८ खसखस - २ चमचे मोहरी - २ चमचे हिरवी मिरची - ३ लसुण - ३-४ पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा मोहरीचे तेल - २ चमचे पंचफोराण - २ चमचे कणिक - १ वाटी मिठ चवीनुसार कृती: १. दोन्ही शहाळ्यांमधील पाणी ग्लासात काढुन घ्यावे व दोन्ही शहाळ्यांची मलई काढुन घ्यावी. शहाळे कापुन घेताना नारळवाल्याकडुन त्याचे वरचे झाकण सुद्धा मागुन घ्यावे.

अखेर ऑस्करला लिओ भेटलाच

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 01/03/2016 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस संपतांना एक समाधानाची भावना आहे … कारण आहे लिओनार्डो दि काप्रिओ ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे ऑस्कर मिळाले तो क्षण …. अनेक महान अभिनेत्यांना कधीच ऑस्कर मिळाला नाही आहे त्यात लिओ पण येतो कि काय अशी धाकधुक मनाला होती, तसे ऑस्कर काही अभिनयाचे सर्वस्व नाही हे पण वास्तव आहेच पण तरीही अखेर लिओला ती बाहुली मिळालीच !!