झेंडूची फुले
"दाखिव सखया मजला तू
काय ठेविलास लपवुनी?
आणिलास गेंद गुलाबाचे
बागेतुनी कुठल्या (चोरुनी?)
गजरा किंवा आणिलास
तू (दहा रुपये खर्चूनी?)
आणिलास नभिचे तारे वा
तव हस्ताने याच तोडूनी?"
"काय करायचे त्या
गुलाबांचे सजावटी?
काय करावे की
गजरा अन तो माळुनी?
काय करतेस ते
नभीचे तारेच आणि?
प्रिये तुजसाठीच
'झेंडूची फुले' आणिली
वाचू आस्वादू
चल तो काव्य रस चाखू
न विसरु ते खाण्या
आतिल खोबरे परंतु!"
काव्यरस
मिसळपाव