Skip to main content

पाच्चा ठोकळा

लेखक आनंद कांबीकर यांनी मंगळवार, 15/12/2015 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
"ये आये, पाच्चा ठोकळा दिना मला" "लई किरकिर नगस करू. तुला कह्याला रे पाच्चा ठोकळा? चल गुमान्, तेवढ्यात कोथमिरिचि जुडी येईन" म्हणत मायनं, रागातच् त्याला पुढं खेचलं. तेव व्हरगाडत चालु लागला. पर त्याची नजर तिकडच हुती, म्हवरं परात मांडून बसलेल्या त्या खप्पड़ म्हताऱ्या कडं. पुढच्या माळणीजवळ माय वांगं निवडत बसली. तेव म्हताऱ्याकडच बघत हुता, टाचा उचकुन अन मान तानुन. माय वांगं पिशीत घिउन उठली अन कोथमिरीवाल्याकडं कोथमिर निवडु लागली. तेव हळुच माई जवळ येऊन हुभा ठाकला. मायणं कोथमीर पिशीत टाकली अन झंपरातल्या पाकिटातून पाच्चा ठोकळा काढला. तसा त्यानं हिसका दिला अन् ठोकळा घिउन पळत सुटला. माय खड़बडून उठली अन जोरात पावलं टाकत त्याच्या मागणं निघाली. तेव पळत म्हताऱ्यापशी आला अन त्याच्या परातीत पाच्चा ठोकळा टाकुन तसाच उभा ऱ्हायला, पुढणं आलेल्या मायच्या डोळ्याकडं बघत. परातीत झालेलं 'ठण्ण' ऐकून आंधळा म्हतारा खुलला पर 'तेव' स्वास रोखुन तिथच् थांबला. रागत आलेल्या मायची डोळं डबडबलं. तिनं आपल्या चिमुकल्याला उचललं अन त्याचं डोस्कं हातात धरुन मटकन मुका घेतला.
लेखनविषय:

वाचने 5363
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

लिखाण आवडलं. 'पाच्चा ठोकळा' म्हणजे पाच पैशाचे नाणे असावे असे धरून चालतोय.

आवडले बुवा लिखाण...

पाच चा ठोकळा म्हणजे पाच रू चे नाणे

छान लिहिली आहे! आवडली! Sandy

छान कथा, लेख वाचण्यापूर्वी चिमुकल्याला उचललं अन त्याचं मुंडकं हातात धरुन मटकन मुका घेतला. हे शेवटचं वाक्य वाचलं अन कथा भीत भीतच वाचली,परंतू सुखद धक्का मिळाला.

छान .

चिमुकल्याला उचललं अन त्याचं मुंडकं हातात धरुन मुंडकं जागी डोस्क चालेल बघा कारण मुंडकं हे शरीरापसून अलग झालेल्या भागास संबोधतात चू भू दे घे... जाणकार आपल्या विजेर्यांचे झोत टाकतीलच. नित आनंद वाचक

In reply to by आनंद कांबीकर

सा सं काही मदत करु शक्तात का बघा नायतर फक्त 'मालिक तेरा सहारा'

सुरेख कथा!

तुम्ही आणि जव्हेरभौ यांची कथांची जुगलबंदी लय भारी चालू आहे! और आन्दो!

आवडली