Skip to main content

मी

लेखक माहीराज यांनी शुक्रवार, 08/01/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मी नशिले फुलपाखरु, जे वार्यावर भिरभिरते... मी शितल जल मृगजळीचे वाळुत ही खळखळते... ढगाळलेल्या आभाळागत आसमात गडगडते... कळ्या कळ्यातुन फुलांबरोबर अशीच मी बडबडते... मी अबोली पाऊलवाट रानावनांतुन भिरभिरते. मी नवेली एक पहाट फुलाफुलांतुन उलघडते.. कधी धुंद धुंद या पावसात मी चिंबचिंब भिजुनी जाते... कधी मंद मंद ही चांदरात मी स्वप्नगंध देऊन जाते... तार्यांसवे लखलखते मी मोत्यांसवे चमचमते मी कधी अडखळते मी, धडपडते मी तरी पुन्हा पुन्हा सावरते मी सांभाळ जरा स्वत:ला      ही प्रित माझ्या मनाची... जाणुन घे रे मजला      मी रीत नवी जगण्याची...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 800
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया