आम्ही व्ही एस एल वाले
मी गेली २ वर्षे मिपा चा वाचक आहे.पण लिहितो पहिल्यांदाच आहे. काही चुकलं तर सांभाळून घ्या.
शीर्षकातून काही बोध झाला नसल्यास उलगडून सांगतो.व्ही एस एल म्हणजे Visual spatial Learner (याला मराठीत काय म्हणतात?)
शिकण्याच्या ३ शैली आहेत.
कोणतीही व्यक्ती एखादी गोष्ट शिकताना खालील ३ पैकी एका शैलीद्वारे शिकत असते.
व्हिज्युअल स्पेशिअल: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन द्रुश्य माध्यमाद्वारे सर्वात चांगलं होतं.
ऒडिटरी सिक्वेंन्शिअल: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन ऎकण्याच्या माध्यमाद्वारे सर्वात चांगलं होतं.
कायनेटीक: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन ती क्रुती स्वत: करुन पाहिल्यावर सर्वात चांगलं होतं.
मी स्वतः VSL असल्यामुळे त्या संबंधी थोडसं लिहायचा प्रयत्न करतो.
VS शैलीने शिकणा-या लोकांना वाचलेलं,ऎकलेलं समजण्यासाठी ते मनातल्या मनात चित्रात (स्थिर किंवा हलत्या) रूपांतर करावं लागतं(पहावं लागतं) किंवा ते होतं.
खाली दिलेल्या चित्रावरून ते लक्षात येईल.
http://www.nailthatpaper.com/wp-content/uploads/2012/05/Visual-spatial-…
http://www.visualspatial.org/images/cartoons/phonics.png
अशाच प्रकारे जेव्हा काही सांगायचं,लिहायचं असतं तेव्हाही ते आधी मनात चित्ररुपाने पाहून इतरांना समजण्यासाठी परत शब्दात रूपांतरीत करावं लागतं.
चित्र स्वरूपात असणारं कोणतंही माध्यम जसे की टि.व्ही,संगणक,मोबाईल फोन,कोमिक्स यांचं आवडतं असतं.
यांना चित्रकला,शिल्पकला यात चांगली गती असू शकते.
फोनेटीक भाषेत वाचलेलं यांच्या जास्त लक्षात राहतं.
हे visual sense बद्दल. त्याचबरोबर यांना अवकाशासंबंधीची(स्पेशिअल)चांगली समज असते.त्यामुळे वास्तुरचना,फर्निचरची रचना,त्यांची खोलीतील मांडणी हे यांचे आवडते विषय असतात.थोडक्यात,
शब्दांऐवजी चित्रं हीच त्यांची भाषा असते.
VSL ची ही फक्त तोंडओळख आहे.विस्तारभयाने थोडक्यात लिहितो आहे. जिज्ञासूंनी खालील संकेतस्थळे जरूर पहावीत.
http://www.dyslexia.com/library/silver1.htm
www.visualspatial.org
longleaf.net/wp/wp.../WriteVisual.pdf
मिपावर असे कोणी VSL आहेत का? त्यांना आलेल्या,येणा-या समस्या त्यावर त्यांनी शोधलेले उपाय याबाबत त्यांनी आपले अनुभव जरूर सांगावेत.
थोडसं अवांतरः मिपावर विविध क्षेत्रात काम करणा-या अनेक तज्ञ व्यक्ती आहेत.व्हि म्हणजे काय याचा थोडा अंदाज आला असेल.मी इलेक्ट्रोनिक वस्तू निर्मितीच्या क्षेत्रात काम करतो.तर या नैसर्गिक वरदानाचा इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात कुठे,कसा उपयोग होऊ शकेल हे कोणी सांगू शकेल का?
भारतात व्हि एस एल चा एखादा फोरम, ग्रुप, व्होटसअप, हाईक ग्रुप आहे का?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5932
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका वेगळ्या विषया संबंधीत तोंड-ओळख आवडली...
फारच ओझरतं झालं की हो साहेब..
आपण दिलेल्या लिंकावरून मला
यांना अवकाशासंबंधीची(स्पेशिअल
नक्की लिहीन
रोचक माहिती. नक्की लिहा.
काही समजलं नाही. कृ० आणखी
या शिकण्याच्या ३ शैली नाहीत, त्या स्मृती संचयाच्या पद्धती आहेत
.
व्हिज्युअल स्पेशिअलबद्दल आणखी थोडं
In reply to . by विवेक ठाकूर
ओरिगामी व बांबूपासून अनेक
In reply to व्हिज्युअल स्पेशिअलबद्दल आणखी थोडं by विवेक ठाकूर
I hear and I forget.
सर्वांचे धन्यवाद
सगळेच मोझार्ट ,रेहमान
अजून लिहा
समजलं नै कै
सर्वांचे आभार
In reply to समजलं नै कै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यू आर ब्लेस्ड!
In reply to सर्वांचे आभार by उपयोजक
ठाकूर साहेब !
In reply to यू आर ब्लेस्ड! by विवेक ठाकूर
लिंक देण्यापेक्षा तुम्हाला काय भावलंय ते इथे लिहा
In reply to ठाकूर साहेब ! by उपयोजक
उपयोग होतोय
In reply to लिंक देण्यापेक्षा तुम्हाला काय भावलंय ते इथे लिहा by विवेक ठाकूर
धन्यवाद !
In reply to उपयोग होतोय by उपयोजक
कळल्यासारखं वाटतंय..पण अजून
In reply to सर्वांचे आभार by उपयोजक
मी फक्त त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलायं
In reply to कळल्यासारखं वाटतंय..पण अजून by असंका
+++१
In reply to मी फक्त त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलायं by विवेक ठाकूर
वरच्या प्रतिसादात तेच तेच परत
In reply to सर्वांचे आभार by उपयोजक