कोबीचे भजे
मैत्रीणींनो, कशा आहात सगळ्या? आधीच क्लिअर करते बाई की भजे, भजी नाहीत. भजे भजे भजे.
बहूतेक जणांना कांद्याचे भजे आवडतात. आता कांदा पडला तामसीक. आणि काही लग्न न झालेली मंडळी अन जैन गुजराती लोकं कांदा खात नाहीत. ते खात नाहीत अन इतरांनाही खाऊ देत नाहीत.
अन कांदा महाग झाला तर आपल्या नवरोबांना अशा पावसाळी वातावरणात मस्त गरम गरम (गरमा गरम हा शब्द मराठी भैये बोलतात) भजे सायंकाळी कामावरून घरी आले की खाऊ घातले की त्यांना नंतरच्या कामाला हुरूप येईल.
मी पण काय बोलत बसले तुमच्याशी? माझे पाभे येतीलच कामावरून. चटचट कोबीचे भजे करायची पाककृती लिहीते अन मी देखील आमच्या यांचेसाठी कोबीचे भजे तयार करायला घेते. त्यांना कोबी फार आवडतो. अगदी फॅनच आहेत ते कोबीचे. मी त्यांना कोबीचे निरनिराळे पदार्थ नेहमी खाऊ घालते. त्यामुळे ते नेहमी उत्साही असतात. चला तर मग. लिहून घ्या कोबीचे भज्यांची पाककृती.
साहित्य (४-५ जणांसाठी):
कोबी (Cabbage) — १ मध्यम आकाराचे (सुमारे ३००-४०० ग्रॅम)
बेसन (Gram flour) — १.५ ते २ वाटी
तांदळाचे पीठ (ऐच्छिक, कुरकुरीत होण्यासाठी) — २-३ चमचे
हिरव्या मिरच्या — २-३ (बारीक चिरलेल्या)
आले-लसूण पेस्ट — १ चमचा (ऐच्छिक)
हळद — ½ चमचा
लाल तिखट — १ चमचा (किंवा आवडीप्रमाणे)
धने-जिरे पूड — १ चमचा
मीठ — चवीप्रमाणे
बेकिंग सोडा (ऐच्छिक, फुगण्यासाठी) — चिमूटभर
कोथिंबीर — २-३ चमचे (बारीक चिरलेली)
पाणी — गरजेनुसार (घट्ट बॅटर होईल एवढे)
तेल — तळण्यासाठी
कृती:
कोबी तयार करा: कोबी चांगली स्वच्छ धुवा. बारीक-बारीक किंवा मध्यम चिरा (जास्त बारीक चिरू नका, नाहीतर भजे नरम होतील).
मिश्रण तयार करा: एका मोठ्या भांड्यात चिरलेली कोबी, बेसन, तांदळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने-जिरे पूड, मीठ, कोथिंबीर आणि बेकिंग सोडा घाला.
बॅटर बनवा: हळूहळू पाणी घालत घट्ट बॅटर तयार करा. बॅटर खूप पातळ करू नका — कोबीवर चांगले चिकटेल एवढे घट्ट ठेवा. १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा (मसाले चांगले भिजतील).
तळा: कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर चमच्याने किंवा हाताने छोटे-छोटे भजे सोडा. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत खमंग तळा.
सर्व्ह करा: गरमागरम कोबी भजे चहा, टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
टिप्स:
भजे अधिक कुरकुरीत हवी असतील तर थोडेसे तांदळाचे पीठ किंवा रवा घाला.
कोबीमध्ये नैसर्गिक पाणी असते, त्यामुळे सुरुवातीला कमी पाणी घाला.
जास्त तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्या वाढवा.
उरलेले भजे दुसऱ्या दिवशी ओव्हन किंवा एअरफ्रायरमध्ये क्रिस्पी करता येतील.
कसे वाटले कोबीचे भजे? नक्की सांगा.
तुमची आवडती
पाभी
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
मस्त रेसिपी, टिप्स खास आवडल्या चांगल्या कूकच्या कृतीची चिन्हे आहेत ती ! कोबीची भजी नक्की करून पाहण्यात येतील ! पुढील लेखनास शुभेच्छा 🙏🏾🙏🏾🙏🏾
पाकृ चांगली जमलीय, पाभी भाभी.
पाकृ चांगली जमलीय. नक्की करून पाहीन पाभी भाभी.
पण फोटू नसेल तर मिपावर पाकृ फाउल धरतात. म्हणून पुढच्या वेळी जेंव्हा मश्रूम फ्राय ची पाकृ टाकाल तेंव्हा फोटू नक्की टाका हं. अश्याच अनवट पाकृ अजून येऊ या. त्यांत शक्यतो कांदा लिंबाचा समावेश असेल असे पहा.
पाभे दादांना कांदा लिंबू चा नमस्कार सांगा.
- (अनिवार्य पाकृ घटक) कांदा लिंबू
😂😂😂😂
In reply to पाकृ चांगली जमलीय, पाभी भाभी. by कांदा लिंबू
😂😂😂😂
छान रेसिपी, एक गृहिणीचा…
छान रेसिपी, एक गृहिणीचा अनाहूत सल्ला
या ऐवजी चिरलेल्या कोबीला थोडा वेळ मीठ लावून ठेवायचे आणि मग त्यामध्ये पीठ मिसळत गेले की पाण्याची गरज लागत नाही, आणि भजे जास्त कुरकुरीत होतात. 😃
धन्यवाद ताई टीप बद्दल. पण मग…
In reply to छान रेसिपी, एक गृहिणीचा… by श्वेता व्यास
धन्यवाद ताई टीप बद्दल. पण मग पिठात वेगळे मिठ नाही टाकायचे ना?
तुम्ही आधी किती मीठ टाकले…
In reply to धन्यवाद ताई टीप बद्दल. पण मग… by पाषाणभेद
तुम्ही आधी किती मीठ टाकले आहे त्यावर अवलंबून आहे
"कोबी",विश्वरुप आहे म्हणून विश्वगुरू आहे.
भजी मधे कोबी,
भाजी मधे कोबी,
कोबीची भाजी,
कोबीची पचडी,
पराठ्यात कोबी,
कोशिंबीरीत कोबी,
सबवे मधे कोबी,
*पुलावर कोबी,
हक्का मधे कोबी,
मांचू मधे कोबी
मोमोझ मधे कोबी,
समोशा मधे कोबी,
सूप मधे कोबी,
पास्ता मधे कोबी!
सॅलाड मधे कोबी
मालाड मधे कोबी
म्हणून म्हणतो.......
विश्वव्यापी कोबी
विश्वगुरू "कोबी",
दुरूस्ती-(* पुलावर ऐवजी पुलाव मधे वाचावे)
फक्त खव्वया असल्याने, पाभे भाभी ,भजी खायला बोलावल्यावर प्रतिसाद देईन.
अहो, वेलकम ना मंग वेलकम.कोबी…
In reply to "कोबी",विश्वरुप आहे म्हणून विश्वगुरू आहे. by कर्नलतपस्वी
अहो, वेलकम ना मंग वेलकम.
कोबी विश्वव्यापी आहे हे सिद्ध होते.
अन रॅप साँग छान लिहीले आहे. एखादा होतकरू, नवा उमेदवार गायक चांगले गायील.
अन दुसरे असे की हा धागाही डिलीट होतो की काय? कुणी डिमांड टाकली असेलही.
नाही
सध्या काही डिमांड नाही. छान आहे रेसिपी, पण अती तिथे माती ही म्हण तितकी आठवली ! भजी करा भजे करा मजे करा.
तुम्ही नका हातात सुत्र घेऊ…
In reply to नाही by वृषभ खोंडे
तुम्ही नका हातात सुत्र घेऊ. काय, किती कुठे कसे लिहायचे ते लेखकाला ठरवू द्या. तुम्हाला अजिर्ण झाले तर विरेचक घ्या.
फक्त एकच खंत आहे की…
In reply to तुम्ही नका हातात सुत्र घेऊ… by पाषाणभेद
फक्त एकच खंत आहे की संपादकांनी (!!??) त्यांचे मत ग्राह्य धरायला पाहिजे होते. उगाच एखाद्या अन ते देखील बाल सदस्याच्या मागणीवरून एक नाही दोन धागे डिलीट करायची अन ते देखील काहीच कारणमिमांसा न करता काहीच आवश्यकता नव्हती.
सांगितले असते तर मीच धागे डिलीट केले असते किंवा आमटीत पाणी टाकले असते.
संपादक काय म्हणता ते मान्य. तुम्ही कोण सांगणारे?
जे काही
In reply to फक्त एकच खंत आहे की… by पाषाणभेद
करते करविते ते संपादक समर्थ आहेत, अन् ते काळे का गोरे हे न पाहता ते काम मात्र चांगले करतायत असे मत नोंदवावे वाटते आहे. आम्ही काहीच सांगत नाही फक्त दाखवतो, मुक निदर्शक - ही पहा घाण लिहिलेली आहे असे म्हणत. पुढील निर्णयासाठी संपादकांच्या फाईन सेन्स ऑफ जजमेंट वर भिस्त सोडून आम्ही रेस्ट (माय केस) करतो. (अजिबात कळवू नये, लोभ तर अजिबातच ठेऊ नये) खोंड्या
आम्ही मेंबरशिप मध्ये खुश…
In reply to तुम्ही नका हातात सुत्र घेऊ… by पाषाणभेद
आम्ही मेंबरशिप मध्ये खुश आहोत ! सूत्रे हलविण्याची अन् हाती घेण्याची गरज नाही आम्हाला. गरम भजी तोंडात घालू नये, ह्यावर एक धागा काढा छानपैकी. वाटचाल त्याच दिशेने आहे तुमची.
रागीची खिचडी ची ही रेसिपि…
रागीची खिचडी ची ही रेसिपि सांगा पाषाणभौ!😇
पाभे का सेहरा सुहाना लगता है
शहनाइयों की सदा कह रही है
खुशी की मुबारक घड़ी आ गई है
सजी सुर्ख जोड़े में चाँद सी दुल्हन
ज़मीन पे फ़लक से परी आ गई है
पाभे का सेहरा सुहाना लगता है
पाभी का तो दिल दीवाना लगता है
पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते
अब तो हर अपना बेगाना लगता है
पाभे का सेहरा सुहाना लगता है
पाभी का तो दिल दीवाना लगता है
सात फेरों से बंधा पाभे का ये बंधन
प्यार से जोड़ा है रब ने पाभी का दामन
हैं नई रस्में, नई कसमें, नई उलझन
होठ हैं खामोश, लेकिन कह रही धड़कन
धड़कन धड़कन, धड़कन धड़कन
धड़कन धड़कन, धड़कन धड़कन
धड़कन, मेरी धड़कन
धड़कन, तेरी धड़कन
धड़कन, धड़कन, धड़कन, धड़कन
धड़कन धड़कन, धड़कन, धड़कन, धड़कन
मेरी धड़कन, मेरी धड़कन
मुश्किल पाभे को छुपाना लगता है
पाभी का तो दिल दीवाना लगता है
पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते
अब तो हर अपना बेगाना लगता है
पाभे का सेहरा सुहाना लगता है
पाभी का तो दिल दीवाना लगता है
लाजून लाजून चूर झाले मी…
In reply to पाभे का सेहरा सुहाना लगता है by कांदा लिंबू
लाजून लाजून चूर झाले मी.
बाकी, आषाढ लागलाय. काही भागात सप्तमात्रूकांना नैव्यद्य दाखवतात.