समाधान !
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच !
पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय?
तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …!
***
होती अमुची प्रिया एक ती
आमची मंजे कंपनीची
सदैव वाटे तिजला कांही
नविन करावे प्रतिमासी
कधी कनेक्टे हार्ट आमुचे
कधी पॉलीस्यां अपडेटवी
तसा एकदा सर्व्हे केला
'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि !
मनात नसता भाग घेउनि
सारे प्रतीसादून आले
सर्व्हे झाला पटपट आणिक
सार निघाले हो झटपट
स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि
छान छान पी पी टी सजवून
आली हो ऐटीत पुण्याला
प्रिया विमानी त्वरित बसून
सगळ्यांना गोळा करूनि
पोपटपंची झाली करून
सगळे आपण कित्ती ह्याप्पी
काव्यरस
मिसळपाव