Skip to main content

शैक्षणिक बाजारहाट

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/06/2016 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आजचा जमाना शिक्षणाचा आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेणं वाईट आहे, असं आज एखादा अशिक्षित माणूसही म्हणणार नाही. सर्व जगाने शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व जग सुशिक्षित व्हायला हवं. मात्र शिक्षण आज ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे माणूस सुशिक्षित होणं लांबची गोष्ट झाली, तो शिक्षित तरी नीट होतोय का अशी शंका घ्यायला जागा आहे. शिक्षण म्हणजे पदवी, पदवी म्हणजे नोकरी, अशा व्याख्या तयार होऊन आज शिक्षणाचा पायाच खचला आहे. कसेही करून पदवी मिळायला हवी. पदवीचे प्रमाणपत्र हातात मिळालं की गंगेत घोडं न्हालं.

मधातील मेवा फळं

लेखक उल्का यांनी बुधवार, 15/06/2016 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
'भुकेला कोंडा नि नीजेला धोंडा' असे म्हणतात.

थक्क करणारी एक घोडदौड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 15/06/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
पेला अर्धा भरला आहे.. पेला अर्धा सरला आहे... पाडगावकरांच्या या कवितेतले भाव इतके कालातीत आहेत की बास! आणि क्षणोक्षण त्याचा प्रत्यय येत राहतो. शंभर व्यक्ती भेटतात, शंभर गोष्टी कानावर पडतात. नाव, गाव, चेहरा, व्यवसाय या पलिकडची माणसाची एक ओळख असते ती म्हणजे त्याचा विचार. त्याला दृष्टिकोन म्हणा, स्वभाव म्हणा, किंवा अ‍ॅटिट्यूड म्हणा इंग्लिशमधे. हा अ‍ॅटिट्यूड माणसाची खरी ओळख करून देतो, तोच माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. बाकी सगळं दुय्यम असतं. संकटं, अडचणी सगळ्यांनाच येतात. काही त्यात खचतात, काही त्यातही रचतात, काही विरतात, काही उरतात, काही पडतात, काही घडतात. अ‍ॅटिट्यूड.

हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 15/06/2016 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
सक्रेणी माता (चित्रात सक्रेणी देवीचे मंदिर) हिमाचल मध्ये मंडी जिल्ह्यातील सक्रेण घाट. चहु बाजूला उंच आणि कठीण हिरवेगार पर्वतराजी. या भागात पाऊस हि भरपूर पडतो. पाऊस झाला कि पर्वत इथे नेहमीच ढासळतातच. पावसाळी दिवसात तर बाहेरच्या जगाशी संबंध हा नेहमीच तुटतो. या भागात वसाहत विरळ आहे. इथले लोक उंचपुरे हृष्ट्पुष्ट आणि काटक शरीरयष्टीचे असतात. माझ्या लेकीचे सासर हि याच भागात आहे अर्थात मंदिरा जवळच आहे.

राजमाची नावाचं मनोरंजन

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 14/06/2016 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
काल पाऊस आणण्यासाठी सह्याद्रीत भटकावे म्हणून राजमाचीला जाणं झालं.कोंदिवडेमार्गे चढताना पाऊस लागला त्याअगोदर जांभळं खायला मिळाली.यावेळेस फोटोग्राफर मिपाकर स्टीव रॅाजर्स/ स्पा/मन्या इत्यादी एकचसोबत होता.फोटोग्राफीच्या टिप्स मिळणार होत्या.येताना तो एक विशलिस्ट घेऊन आलेला.म्हटलं बघू त्यातलं किती जमतंय ते.कर्जत गाडी येवो नाहीतर स्टेशनवरच फिरून आणलेला डबा खाऊन परत जाऊ. वेळेवर कर्जतला गेलो आणि वडा ,डोसा चहा घेऊन सिक्ससीटर ओटोरिक्षा नाका/आमराई नाकाकडे कूच केलं.कर्जत बाजारही बदलत चाललाय गावरानपणा हरवून नवीन दुकाने येत आहेत.चौदा किमी अंतर

मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही,

लेखक जगप्रवासी यांनी मंगळवार, 14/06/2016 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल जुनी अडगळ साफ करताना कॉलेज मध्ये असताना ट ला ट जोडून लिहिलेली कविता सापडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि रात्री ४ वाजेपर्यंत बायकोशी गप्पा मारत बसलो. सहज तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून इथे टंकली. पहिली कविता मी लिहिलेली, माझ्या बायकोला (तेव्हा गर्लफ्रेंड होती) एका साध्या कागदावर लिहून गुलाबा सोबत दिलेली.
काव्यरस

सफर ग्रीसची: भाग २ - प्राचीन कोरिंथ

लेखक निशाचर यांनी मंगळवार, 14/06/2016 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन केप सूनिअनचा सूर्यास्त मनात साठवून पहिल्या दिवशी मुक्कामासाठी कोरिंथला आलो. हे खरं तर नवं कोरिंथ. साधारण साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती असलेलं प्राचीन कोरिंथ (ग्रीकमध्ये Archaia Korinthos) १८५८ साली भूकंपामुळे उध्वस्त झाल्यावर जुन्या शहरापासून दूर नवं कोरिंथ वसविण्यात आलं.

सार्थक जन्म-समर्पण अर्थात नर्मदाख्यान लोककथा.

लेखक खुशि यांनी मंगळवार, 14/06/2016 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
असूर संहारा नंतर थकून बैसले त्रिपुरारी। निढळावरचा घर्मबिंदू एक टपकला भूमिवरी॥ त्या बिंदूतुन प्रगटली एक कन्या सुंदरी। कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥ मी तर असे आपुलीच तनुजा बोले नमस्कारुनी। घर्मबिंदूमधुन आपुल्या जन्म माझा पावनी॥ दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती उरी। तुझ्या जन्माने सुरसे आज तीही झाली पुरी॥ आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी। येई गे मुली बैस अंकी हसून बोले शर्वरी॥ दोन बंधू एक भगिनी मोदे खेळती अंगणी। सुखी गृहस्थी पाहून डोलती उमा आणि मदनारी॥ स्कंद गजानन लपून बैसती शोधतसे मंदाकिनी। कोठे लपले बंधू दोघे खूणे दाखवि
काव्यरस