बँकॉक: धावती भेट: ३. जलयात्रा
भाग १, २
एखाद्या ठिकाणी -मग ते अगदी आपल्या देशात का असेना – एक दोन दिवस फिरायचं तर फारसं काही कळत नाही. दिसतात अनेक गोष्टी, पण त्यांचा अर्थ कसा लावायचा ते समजत नाही. गोंधळ वाढतो.
बँकॉकमध्ये एक दिवस भटकल्यावर मी काहीशी गोंधळले होते. सभोवताली सगळं शिस्तीत आणि शांततेत चाललं होतं. मॉल्समधल्या गर्दीत अनेक स्थानिक लोकही दिसत होते. रस्त्यांवरच्या छोट्या दुकानांतही भरपूर गर्दी होती. स्काय ट्रेनमध्ये गर्दी असूनही धक्काबुक्की नव्हती.
मिसळपाव