Skip to main content

मी एक ढग - एकटाच ...... !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक ढग - एकटाच ...... !!! सखे सोबती जरी कितीक गर्दी गडगडणाऱ्या त्या ढगांची वर्दी कधी चिंब ओल्या पावसात कधी लख्ख कोरड्या उन्हात तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! मनात माझ्या जुनेच सवंगडी नव्या देशातले जरी वारे सभोवती कधी हर्षुन जाई तर कधी उदास ना कसली खंत ना कसली आस तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! नकळत देतो जीवा दिलासा स्वतःच गिळून घेतो उसासा वाऱ्याविना ही फिरतो उगाच ना जाणतो वाट जुनी कि नवी आज तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! कधी शुभ्र कापूस सात्विक सदरा कधी सोनेरी कडांचा मुकुट न्यारा बरसूनही नेहमी गच्चं च भरलेला सर्व जिंकूनही सगळंच हरलेला तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! -----------फिझा !
लेखनविषय:

वाचने 758
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया