Skip to main content

खेल कबड्डी

लेखक रुस्तुम यांनी मंगळवार, 25/10/2016 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच भारतात झालेल्या आणि भारताने विजेतेपद राखलेल्या कब्बडी विश्वचषकानिमित्त मनात आलेले विचार खरडतोय. मिपा वर हा माझा लेखाचा पहिलाच पर्यटन.चू.भू. द्यावी घ्यावी :) "जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया, प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!!" टीम इंडियाचा कबड्डी संघ विश्वचषक उंचावत असताना ह्या जिंगलचे पार्श्वसंगीत वाजत होते.त्या आधी अंतिम सामना जिंकल्यावर हिंदी समालोचक अपना खेल, अपना देश, अपना कप असे काहीसे उत्साहात ओरडत होता. मनात विचार आले की किती खऱ्या आहेत ह्या गोष्टी ..

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/10/2016 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire पिसूक.... (पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.) पहाटे पडलेल्या चित्रविचित्र स्वप्नांमुळे ग्रेगॉर दचकला व गाढ झोपेतून उठला. त्याने हात ताणायचा प्रयत्न केला आणि तो उडालाच. त्याचे ह्रदय धडधडू लागले. त्याचे चक्क एका मोठ्या किड्यात रुपांतर झाले होते.

का कळत नाही तुला

लेखक सोहम कामत यांनी मंगळवार, 25/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
का कळत नाही तुला.. माझ्या प्रेमाचे तराणे.. तुझ्यासाठी केलेले ते.. वेडपट निरागस बहाणे.. तु जवळ नसताना ती.. होणारी असह्य तडफड.. अन् तुझ्या सुखासाठी.. केलेली विचित्र धडपड.. का कळत नाही तुला.. तुच माझी राणी.. तुच माझी कविता.. माझ्या ओठांवरली गाणी.. माझा प्रत्येक श्वास.. माझा एकला ध्यास.. माझ्या वाटेवरली तु.. प्रेमाची ती आस...

मला गरज आहे तुझी

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 25/10/2016 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
गरज आहे मला आज त्या तुझ्या आधाराची अडखळणारे पाऊल माझे सावरणार्या तुझ्या हातांची गरज आहे मला तुझ्या त्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वत:ला सामावून टाकणार्या त्या बाहूंची गरज आहे आज मला त्या तुझ्या कोमल प्रितीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजही मला माझ्यावरच्या त्या तुझ्या नि:स्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटतांना तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे....
काव्यरस

वाट हरवून गेली...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 25/10/2016 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
वाट हरवून गेली... अशीच ती माझ्या समोरून गेली जणू नभात वीज चमकून गेली मिळता नजर डोळे दिपवून गेली उधळीत गंध उडता पदर सावरून गेली जाता मागे मागे मने जुळवून गेली कळलेच नाही कधी वाट हरवून गेली राजेंद्र देवी

सोनचाफ्याची फुलं आणि त्तो स्पर्श(भाग २)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/10/2016 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तीला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची.

देशपांडे -आमचे वडील!

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 25/10/2016 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो.

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 25/10/2016 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का? मूलतः हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न. आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले. आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले,अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव).