जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????
लेखनविषय:
जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????
केलेच नाही तर राहिल कार्य काय ?
.
पोस्टा तळपतिल, फोटु झळकतिल;
फेसबुके अपुला क्रम आचरतिल,
असेच वाद संवाद पुढे चालतिल,
नसशी तु फरक पडेल का?
.
वाद वर्षतिल, डोके पिकतिल,
गेट टुगेदर हे जोरात चालतिल
कुणा काळजी की न तळतिल,
पुन्हा जिलब्यांचे हे घाणे?
.
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा लेख कविता लिहितिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
तु सोडले फेसबुक त्यांचे काय जाय ?
.
अभासी जगास्तव काय कुढावे !
मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ?
डोके पिकवुनी का विन्मुख व्हावे ?
ख-या जगतातील आनंदास???
वाचन
2835
प्रतिक्रिया
0