मूगाची कचोरी
खूप पूर्वी ठाण्याच्या गोखले रोड वर छाया स्वीट्स नावाचे दुकान होते. त्यांची कचोरी प्रचंड फेमस होती. अर्थात ठाणेकर असल्याने रांगा बिंगा लागत नसत दुकानात पण ती कचोरी म्हणजे आय हाय.. मस्तच होती. काळाच्या ओघात ते दुकान गेलं आणि त्याबरोबर ती कचोरीही गेली. नंतर मग गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस नावाचे अगदी लहानसे दुकान आहे तेथे तशीच कचोरी मिळायला लागली ती आजतागायत मिळते आहे.
सकाळी १०-११ च्या सुमाराला तिथे गेलात तर बरेचदा मस्त गरमागरम मूग कचोर्या मिळतात. म्हणजे एरवीही मिळतात पण गरमागरम हव्या असल्या तर तेथे सकाळी जा.
मिसळपाव