Skip to main content

लिहितो कविता तुमच्यासाठी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 22/11/2016 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाखु Tue, 22/11/2016 - 15:26 नवीन कवीता कधी ? लोक खोळंबून राहिलेत तुम्ची नवकविता वाचायला. लवकर टाकणे नवकविता. अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघाची संयुक्त मागणी
-------------------------------------- (खुला सा :- नाखु(न) ;) अंकल आणी त्यांचे मंडळाचे विनंतीस मान देऊन , आंम्हाला त्यांनी टाकलेल्या (वरील) ताज्या खरडीवरून हे काव्य शीघ्र प्रसविले आहे! धीराने घ्यावे! ) लिहितो कविता तुमच्यासाठी जमवून सारी सामग्री शब्द, कल्पना, यमके सारी करूनी त्यांची "ही" जंत्री! विषय कोणता घेऊ सांगा? प्रेमं?, निसर्ग?

अवजार

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 22/11/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
याआधी : मैथिली , माकडीचा माळ , शिट्टी ________________________________________ संध्याकाळ होत आली तसं हरी गाढाव जोंधळ्यात शिरलं. आत शिरल्यावर बऱ्याच वेळानं दोनदा खिकाळलं. मग बाहेर आलं. इकडं तिकडं बघितलं. जाग्यावरंच दोन उड्या हाणल्या. आन पुन्हा एकदा जोंधळ्यात शिरलं. यावेळेस मात्र जरा बेतानं खिकाळलं. समोरच्या झुडपात बसलेलं भानूकुत्रं भेदरुन गेलं. त्यानं थोडं बाहेर येऊन मान खाली घालत त्या जोंधळ्यावर बारीक नजर ठेवली.

कलकत्ता ( कोलकता ) - माहिती हवी

लेखक अल्पिनिस्ते यांनी मंगळवार, 22/11/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
एका लग्नसमारंभासाठी ४ दिवस कलकत्त्याला जायचा योग आला आहे. २ दिवस भट्कंती साठी मिळ्णार आहेत. त्यात कुठे भटकता येईल आणी काय काय हादडता येईल ? कुणी मिपाकर तिथे असतील तर भेटता येईल का ?

खुळ्या सांजवेळा...

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 22/11/2016 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
खुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर कुणी रोज त्याला कसे सावरे ?? कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .. उन्हासोबतीने असे चालते की जणू सावलीशी न नाते जुळे झुगारून देई जुन्या रीतभाती मिठी मारते वादळाला खुळे फिरे धुंद, संदिग्ध पण सोवळेसे, थव्यातून फिरती जशी पाखरे कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .. दिवे लागणीची जशी वेळ येते दिसे अंगणी सांजवातीपरी जणू होत स्मरणे विरागी स्वरांनी फिरे अंतराळी जशी सावरी तमा ना कुणाची कशाची मनाला, जसे मन म्हणे ते तसे वावरे कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय!
काव्यरस

मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 22/11/2016 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
 मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ ___________________________________________________________________ जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले. दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही. असेच दोन दिवस गेले.

झुक्किनी - चीज बाइट्स

लेखक रुपी यांनी मंगळवार, 22/11/2016 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबर हीट सरुन आता हळूहळू पारा खाली सरकतोय. बाकी ठिकाणीही कुठे बोचरी थंडी, कुठे हिमवर्षाव सुरु झालाय. अश्या वेळी काहीतरी नवीन चमचमीत, गरमागरम करुन बघावे म्हणून आणि घरात आणलेल्या झुक्किनीचा काही उपयोग करता येईल म्हणून हा पदार्थ बनवून पाहिला. आप्पेपात्राचाही सदुपयोग आणि तेलाचाही नाममात्र वापर, शिवाय पाकृ फार वेळखाऊ नाही, आणि चवीला.. अहाहा! त्यात गरम बाइट्समधले वितळलेले चीज .... दुपारच्या चहाबरोबर, जेवताना स्टार्टर्स म्हणून सर्वांनाच हे बाइट्स फारच आवडले.