( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका
लेखनविषय:
काव्यरस
सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
राया तो माजा
भ्येटंल काय, न भ्येटंल काय,
वाट पहायाची आपली
पुरी तयारी हाय,
दैवाचीबी परीक्शा
घेइन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
जीवाचा सखा
गावंल काय, न गावंल काय,
समदं ह्या कपाळी
लिव्हल्यालं हाय,
नशिबासंगं आज
पैज लावीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
आयुक्शाचे परश्न
सुटले काय, न सुटले काय,
धन्यासाटी आगीशीबी खेळने
मंजूर हाय,
डोरलं त्येच्याच नावचं
गल्यात घालीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते ...
एकाद्याले जीव लावून
सार्थक जन्माचे होते,
एकल्याने जगताना
जगने अधुरे राहते,
सजनाचे नाव फक्त
माज्या नावासंगं जुळावे,
साथ त्येची भेटली की
जन्माचे सोने व्हावे,
झोकून पिरेम करावे
बस मागने नाही लय,
समदे मिलून बोला जी,
पिरमाचाच व्हावा जय...
****************
प्रेरणा:
http://www.misalpav.com/node/36609,
http://www.misalpav.com/node/36747
वाचने
4933
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
प्रेम करा हो.अवश्य करा.
पण एकाच वेळी दोन-दोन स्थळी???
http://www.misalpav.com/node/36753
अरेच्या! प्रेमळ तडका आणि टपोरी तडका हाय वाटते.
स्वारी.रॉयली स्वारी.
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.. ओके
-दिलीप बिरुटे
ह्ये बी आवडल,
फकस्त हिरवीनीचा शँडल लहान साईजचा अन त्या शँडल मधला पाय जरा मोठा वाटला.
दोन्ही म्याच झाले असते तर लैच मज्जा आली असती.
मग कदाचीत पहिल्या कविते पेक्षा ही कविता जास्त आवडली असती.
पैजारबुवा,
विडंबन जरी असले तरी कविता वेगळी आहे आणि आशय मी गंभीरपणे घेतला आहे. आवडलीय रचना.
"सजनाचे नाव फक्त
माज्या नावासंगं जुळावे,
साथ त्येची भेटली की
जन्माचे सोने व्हावे,
झोकून पिरेम करावे
बस मागने नाही लय"
मीही असंच प्रेम करीन म्हणतो.
-दिलीप बिरुटे
विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता म्हणून पण छान आहे
प्रेम करा हो.अवश्य करा.