मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झाकलेले सत्य

माहीराज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
निर्दयी रुपे दिसती निर्दोष वासरेे सत्य सारे झाकलेले सारेच भास रे पाप सारे झाकुनी दर्शनी साधुच सारे झाकल्या चेहर्यावरती मुखवटे हासरे ।। गोर्या वस्ञांमागे काळीच कारस्थाने शेंदुर थापुनी देती धोकेच प्रामुख्याने सार्यांचा विश्वास आंधळा,                  आंधळीच भक्ती येथेच विस्तारते क्रुर अंधकार शक्ती ।। श्रद्धा असावी परी अंधश्रद्धा नसावी परमेश्वराची वस्ती माणसात असावी माणसाला माणुसकी हिच जात दिसावी चांडाळ ढोंगीपणाला कधी न फसावी..।। तेहत्तिस कोटी देव रुपे असे या भुवरी तरी खोट्या मुर्खांची का जादु सर्वांवरी सोडा तो अट्टाहास, विसरा भोळेपणा आणि अंधश्रद्धा नष्ट करण्याची शपत घ्या उरी...।।

वाचने 1294 वाचनखूण प्रतिक्रिया 3