शंभो
जोगव्यानं त्या सकाळी गहिरे रंग भरले होते. मुग्धाळला पहाट गारवा उष्ण तांबूस किरणांत निथळत होता. पाणवठ्यालगत गुलाब ताटव्यांचे राज्य होते. मंत्राग्नी पुटपुटत त्याने हवनकुंडात स्निग्ध सोडला. उठून एकवार त्या महान तेजोवलयाकडे पाहिले.
"बस्तीर" कमलपात्राच्या जलधारा हातावर सोडत तो उद्गारला.
सेवकानं वाकून मानाचा मुजरा केला.
"एक ऊफाळता चहा"
समाधीवस्थेत जोगव्याने सिंहासन ग्रहन केले. एक पाय उकिडवा सोडत तो गरजला,
"नाउ"
खलित्यावरील राजमुद्रा उठून दिसत होती. दरबानानं तेजोवलय भडकवले.
"हिकडं येक कटींग.."
काळ गोठावला होता. राजधानीची चारी चक्रे रुतून बसली होती.
मिसळपाव