Skip to main content

दिशा : फ्रान्झ काफ्का

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 28/11/2016 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिशा : मूळ कथा फ्रान्झ काफ्का अगदी छोटीशी असलेली गोष्ट काफ्का ने १९१७ ते १९२३ दरम्यान लिहिली गेल्याचं मानलं जातं, पण काफ्का जिवंत असतांना हि प्रकाशित होऊ शकली नाही. काफ्काच्या मृत्यूपश्चात १९३१ साली The Great Wall of China (German: Beim Bau der Chinesischen Mauer) या कथासंग्रहात ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. ------------------------------------------------------------------------------------------------------------ "हे जग दिवसेंदिवस लहान होत चाललं आहे." दुःखी चेहऱ्याने उंदीर म्हणाला. आधी तर हे जग किती मोठं होतं, तेव्हा मला खूप भीती वाटायची.

बलुची लोक व बलुचिस्तान : एक संक्षिप्त आढावा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 28/11/2016 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केल्यानंतर त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, जगभरच्या लोकांत, बलुचीस्तानबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षा अनेक पटींनी अज्ञान आहे. तेव्हा माझे अल्पज्ञान इथे मिपाकरांबरोबर वाटून घ्यावे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. असो. स्वानुभव १९८२ ते १९९६ या कालखंडात मी माझ्या एका परदेशी नोकरीत अनेक सामान्य व अधिकारी बलुची लोकांबरोबर १४ वर्षे रोजचे काम केले आहे. सर्वसाधारण बलुची मित्रत्वाचा व्यवहार करणारा, शिस्तप्रिय, कामाला वाघ व विश्वास बसला की जीवाला जीव देणारा असलेला पाहिला आहे.

विदाऊट अ ट्रेस - २ - स्टार टायगर आणि स्टार एरीयल

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 28/11/2016 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
Without A Trace 2 - Star Tiger and Star Ariel १९४८ सालचा जानेवारी महीना.. पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिस्बन इथल्या विमानतळावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची लगबग सुरु होती. नुकत्याच आटपलेल्या दुसर्‍या महायुद्धात पोर्तुगालचा सत्ताधारी सालाझारने जर्मनी आणि दोस्त राष्ट्रांकडून येणार्‍या दडपणांना बळी न पडता पोर्तुगाल तटस्थ राखण्यात यश मिळवलं होतं. महायुद्धात तटस्थ राहील्याप्रमाणे युरोपातल्या इतर राष्ट्रांप्रमाणे पोर्तुगालला युद्धाची झळ बसली नव्हती. त्यातच लिस्बन हा पोर्तुगालमधला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने देशोदेशीचे - मुख्यतः युरोपातले प्रवासी इथे मोठ्या प्रमाणावर दिसत होते.

अंकुर

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/11/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तसरुच्या काट्यामधुनी झरझर लागे पाझरु कृष्णवनीच्या खोडामागे चाले रे पाखरु घनान वारा भनान होई सप्तसुरांचे तरु सृष्टीचे हे सारमिलन रे अवचित अंबर झरु चकोर चांदणी नभात दिसता आम्ही रे बावरु टपटप चाले सावज ऐसे टपटप रे पाखरु उनाड गाई खळ्यात येत्या लागती हंबरु उत्थानाची सांजकृपाळी मोत्यांनी पांघरु अवखळ येती गंगामाई उधळे रे वासरु कृष्णकळ्यांच्या वेलीवरती जिंकू किंवा मरु

कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 27/11/2016 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको! (हा ले़ख नुकताच ईसकाळच्या पैलतीर या सदरात प्रकाशित झाला आहे) (वाचकांना एक खास विनंती! हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. "बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते. या लेखातील बरेच मुद्दे मला न पटणारे आहेत व ते वाचून मला आश्‍चर्यही वाटले.

अरण्यानुभव

लेखक रुस्तुम यांनी शनिवार, 26/11/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्राचा मेसेज आला की मे महिन्यात ते व्याघ्रगणती साठी नागझिरा अभयारण्यात जात आहेत आणि मी थोडा अस्वस्थ झालो. ओमान मध्ये आल्यापासून मी एक गोष्ट फार मिस करतोय ती म्हणजे भ्रमंती. भारतात असताना दर २-३ महिन्यातून कुठे न कुठे जाणे व्हायचेच,मित्रांबरोबर म्हणा, कुटुंबासमवेत म्हणा. पण इथे त्या गोष्टीना आळा बसलाय.एक तर फिरण्यासारखं फार नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःच वाहन नाही अजूनपर्यंत तरी. असो.तर तो मेसेज वाचून फक्त पुढच्या वर्षी आपण परत जाऊ रे असं म्हणून समाधान करून घेण्याविषयी पर्याय नव्हता.

गुप्तधनाचे रहस्य

लेखक jp_pankaj यांनी शनिवार, 26/11/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
"आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ...हॅ हॅ हॅ..आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ हॅ.हॅ..हॅ.. " "गपये.." "आंऊऊऊऊऊऊऊऊ...हँ..हँ..हँ... " आत गप्तो का ?. उगाच ओरडायला जनावरासारखा." पल्लवीने समोरील पटावरील एक प्याद उचलुन हातात पकडल्,पुढली चाल करायच्या आधी पार्थ कडे एक नजर टाकली. "ताई ते तर आहेच जनावर्, डुकरासारखा लोळतय मगापासुन आणी आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊ.....

तू फक्त.....

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 26/11/2016 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
तू फक्त चल म्हण मी कधीची तयार आहे बेगडी समाजाच्या बेड्या तोडायला आतुर आहे तू फक्त बोल म्हण मी सांगायला तयार आहे न उल्लेखलेल्या घटनांची आज फुटणार माळ आहे तू फक्त हो म्हण सगळं मी निभावणार आहे संगत-सोबत असेल तुझी तर समाजाला अंगावर घेणार आहे तू फक्त.... फक्त.... आहे मी म्हण....... म्हण मात्र ... जोवर अंगात प्राण आहे... कलेवरा जवळ बसून राडण्यापेक्षा जोवर तू अन् मी आहे तोवर 'जहां हें'
काव्यरस