Skip to main content

विमान

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 05/03/2017 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
विमान असते धावत जेव्हां, वाटे जीवनी सर्व मिळावे उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे जीवनी गुपित कळावे विमान असते धावत जेव्हां, हद्द होते सरहद्दींची उंची गाठतो, कळते तेव्हां, हद्द एक गोल पृथ्वीची विमान असते धावत जेव्हां, वैभव मागे सरकत असते उंची गाठतो, कळते तेव्हां, वैभव डोंगर द-यात असते विमान असते धावत जेव्हां, आपुले जग आपुले असते उंची गाठतो, कळते तेव्हां, आपुले जग आपुले नसते विमान असते धावत जेव्हां, काळ मागे मागे जातो उंची गाठतो, कळते तेव्हां, काळ मागे मागे येतो विमान असते धावत जेव्हां, मोल असते वेगाचे उंची गाठतो, कळते तेव्हां, मोल खरे नियंत्रणाचे विमान असते धावत जेव्हां, वाटे हवी हवाई सु
काव्यरस

बाळकडू

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 05/03/2017 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटेच कोसळला एक जुनाट निर्मनुष्य वाडा अन त्याला साथ देणारा चिमणीपाखरांचा खोपा नजर आपसूक शोध घेऊ लागली हरवलेल्या अस्तित्वाचा पण तुटक्या घराच्या काही काटक्याच फक्त उडत होत्या स्मशानराखेसारख्या. बुल्डोजरच्या कोलाहलात हरवलेले उमलत्या चोचींतले कोवळे स्वर ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली चिवचिवणारी अखेरची धडपड मनात चर्र झालं पण… शहाण्या माणसाकडून तिला एवढंतरी बाळकडू मिळालं पिलांना घेऊन चिमणी उडाल्याचं मला मागाहून कळालं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - इंग्लंड विरुद्ध आयर्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 05/03/2017 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
२ मार्च २०११ चिन्नास्वामी, बँगलोर बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये ग्रूप बी मधली इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातली मॅच रंगणार होती. अवघ्या ३ दिवसांपूर्वी याच स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टाय झालेल्या मॅचची धुंदी अद्याप बँगलोरच्या प्रेक्षकांवरुन उतरलेली नव्हती. हॉलंडविरुद्धं पहिली मॅच कण्हतकुंथत जिंकल्यावर आणि भारताविरुद्धची मॅच टाय झाल्यामुळे इंग्लंडच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची होती. २०१५ च्या पुढल्या वर्ल्डकपमध्ये टेस्ट स्टॅटस न मिळालेल्या संघांची संख्या मर्यादीत करण्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे आयर्लंडच काय पण इतर असोसिएट संघांमध्येही नाराजी पसरलेली होती.

मोबियस भाग-३ : प्रकरणे २९-३०

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 04/03/2017 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
“झाडच आणायचे असेल तर पिंपळाचे आणूयात. त्याच्या पानांची सळसळ कानाला बरी वाटते.” पानांची सळसळ, फांद्यांपासून मुक्त होण्याची निष्फळ धडपड. त्याच्या भावनांचे बंधन झुगारुन त्याचा श्वास मंद चालत होता. त्याला रडू फुटले.

स्मरणचित्रं - गाण्यांमधला देव आनंद!

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 04/03/2017 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
देव आनंद हा आपला अत्यंत आवडता हिरो!( आपला म्हणजे माझा …हल्लीच्या पिढीमध्ये (म्हणजे सुद्धा माझ्याच पिढीमध्ये …मी काही ७० वर्षांचा म्हातारा नाहीये) देव आनंद काही फारसा कुणाला आवडत नाही …एक तर तो चेष्टेचा विषय आहे किंवा अगदी त्याच्याबद्दल काही मत असावं इतका तो हल्लीच्या पिढीतल्या लोकांना महत्वाचा वाटत नाही … तो अगदी विस्मृतीत गेला नाही एवढंच …तर ते एक असो ) …म्हणजे मला त्याचा एकदम fan म्हणा हवं तर.आता देव आनंद काही फार ग्रेट अभिनेता वगैरे नव्हता. त्याच्या संपूर्ण करिअर मध्ये त्याने फार चांगला अभिनय केला आहे असं काही कुठे आपल्याला फारसं दिसलेलं नाही.

दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 04/03/2017 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस) चि शरण्या (उर्फ पिन्नीस) उद्या तुला पाच वर्ष होतील. तुला म्हणून हे असम्बद्ध पत्र लिहीतो आहे. खरतर स्वतालाच उद्देशून आहे हे. शब्द तोकडे असतील पण भावना मात्र खर्‍या आहेत. पाच मार्चची तारीख माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी तारीख आहे. देवाने मला दिलेला स्पेशल डे आहे म्हण ना. आता मी लिहीलेल तुला कदाचित वाचता येणार नाही पण थोडी मोठी झाल्यावर तुला कळेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते. मला तो दिवस अगदी कालच्या सारखा आठवतो. सन्ध्याकाळी ४ पासून मी अस्वस्थ येरझार्‍या घालतो होतो. डॉक्टरीण बाई मध्ये मध्ये येऊन काय काय सान्गून जात होत्या.

पुडाची वडी

लेखक सविता००१ यांनी शनिवार, 04/03/2017 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः १.खरं तर फेसबुक वर ही पा़कृ. पोस्ट करून हा .... जमाना लोटला. पण इथे आपण काही लिहूया असं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं हो. जाम घाबरते मी इथल्या सुगरणींना आणि बल्लवाचार्यांना. तेव्हा त्यांना सगळ्यांना नमन करून आणि पिराताईंचं स्मरण करून इथे धिंगाणा घालायचं ठरवलंय आज. बघा राव... छळायचं नाय उगा... ;) २. आमचा कॅमेरा कम मोबल्या लैच बेसिक हाय. तेव्हा फोटोकडे फक्त पाकृची कल्पना येण्यासाठी असलेलं माध्यम अशा दयार्द्र दृष्टीने पहावे. ३. नाही हो.. संपलं सगळं सांगून. राधिका स्पेशल (माझ्या नवर्याची बायको वाली) पुडाची वडी आज पहिल्यांदाच करून पाहिली आणि मस्त झाली.

गैरसमज

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 04/03/2017 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या विषयी सगळ्यांना गैरसमज मोठा आहे प्रत्येकाला असे वाटते की मी खूप शहाणा आहे

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - भारत विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 04/03/2017 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ चा वर्ल्डकप हा १९८७ आणि १९९६ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेल्या तिसरा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं यजमानपद भारत - पाकिस्तान - श्रीलंका आणि प्रथमच बांग्लादेशला बहाल करण्यात आलं होतं, पण २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर लाहोरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे यजमान म्हणून पाकिस्तानची हकालपट्टी करण्यात आली आणि पाकिस्तानमध्ये होणार्‍या मॅचेस उरलेल्या ३ देशांत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच पाकिस्तानने बराच थयथयाट करुन पाहिला, अगदी आयसीसीला कोर्टाची नोटीसही पाठवली, पण आयसीसीने त्याला अजिबात भीक घातली नाही.

अंबरनाथ ते चौक सायकल सवारी

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शनिवार, 04/03/2017 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
१३/०२ ला ८०+ कीमी ची राईड केल्यावर सेंच्युरी राईड एकट्याने करण्याचा संकल्प केला होता . सुट्यांची उपलब्धता पाहता आजचा दिवस नक्की केला .. पण ,हा सर्व आठवडा वाढदिवस व त्यात लग्नाचा ही वाढदिवस कालच झाला . घरी २२ तारखेच पिल्लू सोडताच , मला एक दिवस डोंबिवलीत जायचय तूझी सूटी असेल तेव्हाच हे शक्य होइल त्यामुळे २२ ला जर सायकलिंग ला जायच असेल तर ९:३० पर्यंत परत ये . तू आलास कि मी निघेन असा वटहुकुम निघाला. ( वट हुकुम ची व्युत्पत्ती अशी असावी : वटवृक्षाला फेरे घालून , ज्याच्यावर हुकुमत गाजवता येते अशा प्राण्याला जो हुकुम सोडतात तो ) असो . एक तर वाढदिवस आठवडा म्हणजे सौ जन्य सप्ताह ..