साहित्य
६०० ग्रॅम चिकन लेगपीस, स्किन सकट
१ गड्डी लसूण, सोलून, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
२ ते ३ हिरव्या मिरच्यां, बरीक चिरून
२ कांदे, पातळ उभे चिरून
१ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
१ चमचा हळद
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा ओवा
१/२ वाटी बेसन
३ मोठे चमचे कॉर्नफ्लार
१ १/२ चमचा मीठ
तळायला तेल
कृती
चिकन धुवुन कोरडे करून घ्या. मायक्रोवेव्ह, ओव्हन मोड मध्ये १७०/१८० डिग्री ला प्री-हिट करून घ्या. चिकन चे लेग पीस ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे भाजायला लावा.
आलं, लसूण बारीक आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. कांदे पातळ उभे चिरून घ्या. कांद्याला, सगळे मसाले (लाल मिरची पावडर, हळद, बिर्याणी मसाला/गरम मसाला), ओवा, आलं, लसूण, हिरवी मिर्ची आणि १ चमचा मीठ लावून बाजूला ठेवा.



चिकन भाजून झालं कि गार करून हाडं, स्किन आणि चरबी टाकून द्या. शिजलेले बोनलेस चिकन श्रेड करून घ्या.

चिकन कांद्याच्या मिश्रणात टाकून, ते निट मळून घ्या. ह्यात आता ३ चमचे कॉर्नफ्लॉर, आणि लागेल तसं बेसन घालून, मिश्रण भज्यांच्या पीठ सारखे करून घ्या. चव बघून लागल्यास मीठ घाला.

कढईत तेल गरम करून, भज्या थापून, मध्यम आचेवर तळून घ्या. गरमागरम चिकन खेकडा भजी तळून मीठ लावलेल्या मिरच्या सोबत खायला घ्या!


[चिकन लेगपीस ओव्हन मध्ये नं भाजता, प्रेशर कुकर मध्ये सुद्धा एक शिट्टी देऊन शिजवून घेऊ शकता. मी कोथिंबीर घालायचं विसरलो, ती सुद्धा बारीक चिरून घालू शकता. मिश्रण नीट मिळून येण्यासाठी, थोडं पाणी घातलं तरी चालेल, मला लागला नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं, तेवढा पुरेसा आहे. तळताना फार वेळ तळावे लागत नाही, तुम्ही कांदा जितका पातळ चिराल तेवढ्या पटकन ह्या भज्या शिजतील, कांदा, लसूण, मिरच्या आणि आलं चिरायला मी मांडोलीन/स्लाईसर वापरला].

प्रतिक्रिया
हा आयडी बॅन केला पाहिजे.
हसून फुटलो......
In reply to हा आयडी बॅन केला पाहिजे. by गणामास्तर
:))
In reply to हसून फुटलो...... by माम्लेदारचा पन्खा
करा करा..
In reply to हा आयडी बॅन केला पाहिजे. by गणामास्तर
अगागागागा!!!
लय भारी...
दिसतय छान पण मी नाही खाऊ
वाखु साठवली आहे. भेटल्यावर
एक नंबर !
सांभाळुन!
चिकन नीट शिजवले / तळले तर
In reply to सांभाळुन! by ज्योति केंजळे
भारीच ............
चिकन कशाने किसले ?
In reply to भारीच ............ by रॉजरमूर
प्रचंड चिडचिड होते असे धागे
आपण
भयावह सुंदर!
अरेरे
मी चिकन खात नाही
वाह
हान तिच्यायला केडी भाऊ दंडवत
धन्यवाद.....
In reply to हान तिच्यायला केडी भाऊ दंडवत by कैलासवासी सोन्याबापु
केवळ क्लास...
पुदिना चटणी...
In reply to केवळ क्लास... by मराठमोळा
शंका.
चालेल हो चालेल...
In reply to शंका. by आनंदी गोपाळ
खेकडा?
बेसन च्या ऐवजी थोडा जाड रवा
वर्णन आणि चित्रे
airfryer मध्ये बाकरवडी
वाह!
In reply to airfryer मध्ये बाकरवडी by सप्तरंगी
मस्तं!
कोलंबी,तिसऱ्या,कालवं इ.