Skip to main content

अंजलीची गोष्ट - रिप्लाय

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 07/03/2017 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
"फ्री आहेस का बोलायला?"..... मनस्वीने विचारलं. "हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली "हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती. "ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली. "हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं. "हो आठवतो.... इतक्या वर्षांत कधी बोलणं नाही झालं त्याच्याबद्दल. कुठे असतो तो?आणि मेसेज का केला होता?" अंजलीने विचारलं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - सेमीफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/03/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
३० मार्च २०११ पीसीए, मोहाली चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात 'Mother of all contests' - भारत आणि पाकिस्तान या पारंपारीक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली दुसरी सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलला भारताने सलग ३ वेळा वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला होता तर पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा अक्षरशः खिमा केला होता. या सेमीफायनलमधील विजेत्या संघाची फायनलमध्ये मुंबईला वानखेडेवर श्रीलंकेशी गाठ पडणार होती. क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण आफ्रीकेला धूळ चारणार्‍या न्यूझीलंडचा श्रीलंकेपुढे मात्रं निभाव लागला नव्हता.

द क्लिफ !

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 06/03/2017 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचं हा निर्णय घ्यायला अर्धांगिनीनी अक्षम्य वेळ लावला त्यामुळे जिथेजिथे फोन केले तिथेतिथे `वी आर ऑलरेडी सोल्ड आऊट, सर !' असा गोड प्रतिसाद मिळाला. पण वस्तुस्थिती कायम निर्वैयक्तिक असते, आपण तिच्याकडे पॉजिटीवली बघितलं तर ती संधी होते नाही तर अडचण ठरते हा बेसिकच फंडाये. त्यामुळे नवं डेस्टीनेशन ट्राय करु या म्हटलं. अँड इट रिअली टर्न्ड आऊट टू बी अ ग्रेट सरप्राईज ! 1 भूगावच्या फॉरेस्ट ट्रेल स्कीममधे हे रिसॉर्ट आहे. पुण्यापासून फारतर सोळा/ सतरा किलोमिटर्स असेल.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - क्वार्टरफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 06/03/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
२५ मार्च २०११ शेरे बांगला, मीरपूर बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाक्क्यातल्या मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडीयममध्ये दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपची तिसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. आदल्या दिवशीच महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय संघाने क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली सद्दी संपुष्टात आणल्यामुळे १९९९ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया सोडून दुसर्‍या संघाला वर्ल्ड चँपियन होण्याची संधी मिळणार होती. ऑस्ट्रेलियानंतर या वर्ल्डकपचा प्रमुख दावेदार म्हणून अर्थातच दक्षिण आफ्रीकेकडे पाहिलं जात होतं.

भिल्ल भारत: शेवटचा भाग

लेखक मिडास यांनी सोमवार, 06/03/2017 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे.

कवितेवरची कविता

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 05/03/2017 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही कविता सुचलेल्या, काही चक्क पाडलेल्या, काही कविता छोट्या, तर काही उगीच वाढलेल्या... काही कविता भिजवणा-या आषाढातल्या धारांसारख्या, काही लागतात जीवाला, वळवातल्या गारांसारख्या.. काही असतात सरळ सोप्प्या होतात त्यांची गाणी, हाती येत नाहीत काही; अळवावरचं पाणी.. काही असतात साध्यासुध्या स्पष्ट असतो अर्थ, तर काही "ग्रेस"फुल्ल नादी लागणं व्यर्थ... काही असतात लाजाळू त्यांची बनते वही, काही इतक्या उतावीळ 'लाईकू'न घ्यायची घाई.. कशीही का असेना कविता असते सई, एकदा हात धरला की साथ सोडत नाही..
काव्यरस

मोबियस : भाग-३ : प्रकरणे ३१-३२ व मोबियस भाग :४ प्रकरण ३३ समाप्त.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 05/03/2017 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
...ते बघून तिलाही हसू आवरेना. त्याच्या डोक्यात एकमेकांना जोडलेल्या असंख्य खड्ड्यांचे जंजाळ आकार घेत होते. पण तिला मात्र ते त्याचे उत्तेजन वाटत होते. अर्थात हे सगळे नैसर्गिकच होते..

पागोळ्या

लेखक निराकार गाढव यांनी रविवार, 05/03/2017 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांसंगं मला जाऊं द्या की रं मला बी पान्यात खिळू द्या की अंगात वारं भिन्नू द्या की रं मला बी पावसांत भिंजू द्या की ——- (चाल क्र. १) गच् झाकून टोपलं भाकार पिठलं शेताकडं चालूया लप् लप् लुगाड टाचून धोतार खोचून लावनी करतिया लग् बग् इरल्याखाली गानं घुमूं द्या SS इरल्याखाली गानं घुमू द्या की रं, मला बी कामावर यिऊं द्या की ——- (चालीत बदल – चाल क्र.
काव्यरस