पुस्तकांविषयी सर्वकाही...
नमस्कार मिपाकर्स..
सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!!
आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात.
अंजलीची गोष्ट - तिघी (कथा)
"आई, मोहना आणि शालिनी बरेच दिवस म्हणतायत भेटूया म्हणून. या शनिवारी जाऊन येऊ? तू रियाला बघशील?" अंजलीने आईला विचारलं. आई होच म्हणणार आहे हे माहीत असलं तरीही रियाची जबाबदारी आजीवर टाकण्याआधी अंजली नेहेमी आजीची परवानगी घेत असे. आजीची आणि रियाचीसुद्धा!
शनिवारी लंचला त्या तिघींच्या ठरलेल्या सीफेस रेस्टाॅरंटमधे भेटायचा प्लॅन ठरला. हे रेस्टाॅरंट तसं थोडं लांबच पडायचं पण शांत, निवांत माहौल आणि खिडकीतून दिसणारा समुद्र ..... त्यामुळे तिघीनांही तिथे भेटायला आवडायचं. ड्राईव्ह करताना अंजली आठवू लागली. मेडिकल कॉलेज मधे सुरु झालेल्या या मैत्रीला आता तब्बल पंधरा वर्ष झाली होती.
मराठी भाषा दिन २०१७: चव नै न ढंव नै सोंगाडी (अहिराणी भाषा)
.
चव नै न ढंव नै सोंगाडी
.
शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां.
पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड.वर्ल्डकप क्लासिक्स - २००3 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
२ मार्च २००३
सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ
ईस्टर्न केप प्रांतातल्या पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कच्या मैदानावर पारंपारिक अॅशेस प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पूल ए मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या पाचही मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया आधीच सुपर सिक्समध्ये धडकली होती त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने या मॅचला फारसं महत्वं नव्हतं, पण We want to win everything या वृत्तीने वर्ल्डकपमध्ये उतरलेल्या स्टीव्ह वॉला एकही मॅच गमावणं आणि ते देखिल इंग्लंडसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हे कधीही मंजूर होणं शक्यं नव्हतं.
मराठी भाषा दिन २०१७: इचारं (हुबळी, शिकारपूर, मैसूर बोलीभाषा)
.
‘अप्पण्णम्मा, टप्पण्णम्मा’ धाकटा इशालं तंचे आतीसोबत खेळरलते. आतीबी इशालबरूबर खेळतानी धाकटी व्हलरती. बाजूकडे थोरला दर्शनं भोरा-दोरी घिउनं फिरूवाचेले कोसिस करलेयताय. जरागडी कोसिसं करूनं तंला हायकी भोरा फिरवालाचं ईनसारके हून बसले. मागूटने तंना की मोट्याने हाका माराला सुरू करूनगून सोडला. ‘ए आती, भोरा फिरचना गा’ मसून. आती तला मटली, ‘खेळाला आले नई तर ठून येजा, जरागडी उगीच बसा आता’.
दर्शनं बोलला, ‘नम्मे, तू फिरवाचे सांग मन्ना, अनि कसी फिरतेते भोरा’. आती बोलली, ‘नई बा, तुमी लोके सकाळे सात घंटेचेने खेळरालात.मराठी भाषा दिन २०१७: सुतंत्रम् (तंजावर मराठी)
.
काल चिम्मी कोंतकी एक पुस्तक वांचत बसलोती. मध्ये मजंकडे, “बाप्पा, ब्रिटीश लोकं अत्तापणीं हायेंत का ?” मणूँ विचारली.
“ऑफ़कोर्स, हायेंत की. अस्का विचारलीस?”
“नाई, 1947 मध्ये अमाला सुतंत्रम् मिळ्लं तम्माच अमी तेनास अग्गिदनांसींइनं मारूँटाकलं असंल की मणूँ मला वाटलं...”
तिज ते निरागस प्रश्न योच्ना करूँ मला हांसू आलं. “गाँधी जन्म देल्ते अहिंसाचं देशांत असंपणीं एक गडबड का ?” असं विचार केलों.
तजनंतरं मला सुचलं, असल्ते प्रश्न विचाराला चिम्मी येऊँ एक ल्हाँ पोरी नहो म्हणून...भिल्ल भारत
काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे.
मराठी भाषा दिन २०१७: ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण (वर्हाडी)
.
ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण
माया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास झालता. ते इंग्रजी गाववाल्यायले रडवतेच न जी. मंग सप्लीमेंटरीच्या टायमाले म्याच माया काकाले घेउन त्याले पेपर तपासनाऱ्या मास्तरकड घेउन गेलतो. तसं पोरगं हुशार होतं, फक्त इंग्रजीच तरास देत होती. तसबी इंग्रजी शिकून कोठ कालेजात प्रोफेसर व्हाचं होतं? आमी त्या मास्तरले बंद बराबर समजावून सांगतलं, मास्तरले बी पटलं आन झालं पोरगं पास.मराठी भाषा दिन २०१७: सौदा (कोल्हापुरी)
वडगाव (बुद्रुक), कारखानावालं, आसलं जंक्शन नाव वडगावला कुणी दिलं, कुणाला ठावं. यष्टीच्या बोर्डावर काय ते मावत नव्हतं. तालुक्याला जाणाऱ्या शेवटच्या यष्टीनं गावकुसाबाहेर पडताना झाम्मदिशी यू टरन घेतल्याबरुबर यष्टीच्या लायटीचा उजेड नदीकडच्या उतारावरच्या देशी बारच्या दरवाजातून आत शिरला आन भिताडापशी वळीनं मांडल्याल्या बाटल्या हिरकणीसारक्या झागमाग करून गेल्या.
मिसळपाव