Skip to main content

झेप

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 10/03/2017 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
पक्ष्यांनी तर उंच उडावे  क्षिती नसावी पडण्याची अन भीती नसावी आभाळाची डोळ्यांमधल्या स्वप्नांसाठी पक्ष्यांनी तर उंच उडावे   पिंजरे सगळे तॊडून टाकून दाणे पेरू मागे सोडून नजर लावूनी निळ्या नभांवरी  पक्ष्यांनी तर उंच उडावे कुणी क्वचित मेघांत हरवतील  इंद्रधनूच्या पारही जातील, ना जावे तर कसे कळावे पक्ष्यांनी तर उंच उडावे शोध नव्हे हा आभाळाचा शोध पंखांतील बळाचा गंगनभरारी घेताना पक्ष्याने स्वतःला तोलावे पक्ष्यांनी तर उंच उडावे डाॅ. माधुरी ठाकुर https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

अंदाजे-गालिब

लेखक मिडास यांनी गुरुवार, 09/03/2017 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
शायरी म्हटलं कि गालिबचं नाव पहिलं ओठांवर येतं. आणि त्याच्यात प्रेमभंग वगैरे असेल तर गालिबला पर्याय नाही. त्या गालिबच्या काही शेरांचा मज पामराने लावलेला अर्थ.

ग म भ न ....

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/03/2017 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
सकालधरन॓ माय लय आटवत हुती उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू? आजपास्न॓ बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर॓ का, रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल” मी सिकाया गेलो.

चंद्र नको , तारे नको

लेखक अभिषेक पांचाळ यांनी गुरुवार, 09/03/2017 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट भारी नको , साधी नको , नको पुरी गोड भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची साथ हवी , जन्मासाठी , उरल्या साऱ्या जन्मांची हसू नको , रुसू नको , नको आशा सुखाच्या बस हात हवा , हातामध्ये , तुफानी त्या दुःखाच्या अश्रू नको , दुःख नको , नको भाव ते रोशाचे एक हवे बस , रोज मला , दर्शन तुझ्या हास्याचे सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची - अभिषेक पांचाळ
काव्यरस

आदिप्रश्न

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/03/2017 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
धगधगे कोटी सूर्यांचे स्थंडिल अहर्निश जेथे का अनादि ब्रह्माण्डाचे लघुरूप जन्मते तेथे ? अणुगर्भ कोरुनी बघता जी अवघड कोडी सुटती त्या पल्याड पाहू जाता का शून्य येतसे हाती ? का अंत असे ज्ञेयाला की ज्ञान तोकडे ठरते की सीमा अज्ञेयाची अज्ञात प्रदेशी वसते ?
काव्यरस

स्त्रीयांचे निवडस्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 09/03/2017 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
या लेख शिर्षकात प्रयूक्त पारिभाषिक संज्ञा : स्त्री म्हणजे woman, निवडस्वातंत्र्य म्हणजे right to make ... choices, भारतीय राज्यघटना म्हणजे Constitution of India, अनुच्छेद २१ म्हणजे article 21. इथे प्रत्येक शब्द एवढ्या साठी दिला की कायदे विषयक वाचन करताना प्रत्येक शब्द सुटा आणि एकत्र वाचण्याची सवय असलेले चांगले. आणि दुसरे ज्या शब्दाच्या अर्था बाबत द्विधा स्थिती असते तेथे मूळ इंग्रजी शब्द बघावयाचा -आणि न्यायालय त्याचा काय अर्थ काढते ते पहावयाचे - असते हे माहित रहावे म्हणूनही. स्वातंत्र्य या शब्दासोबत मला न टळता आठवणारे न.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 09/03/2017 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
२०१५ चा वर्ल्डकप हा १९९२ च्या वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला दुसरा वर्ल्डकप होता. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ग्रूपमधल्या मॅचेसनंतर क्वार्टरफायनल, सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीने मॅचेस खेळवण्यात येणार होत्या. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच १४ संघांचा या वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यात आला होता. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच या वर्ल्डकपसाठीही ब्रँड अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकरची नेमणूक करण्यात आली होती.

सामाजिक उपक्रम - २०१७

लेखक निशदे यांनी गुरुवार, 09/03/2017 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. उपक्रमाविषयी थोडेसे: माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.