का कळत नाही तुला
लेखनविषय:
का कळत नाही तुला.. माझ्या प्रेमाचे तराणे..
तुझ्यासाठी केलेले ते.. वेडपट निरागस बहाणे..
तु जवळ नसताना ती.. होणारी असह्य तडफड..
अन् तुझ्या सुखासाठी.. केलेली विचित्र धडपड..
का कळत नाही तुला.. तुच माझी राणी..
तुच माझी कविता.. माझ्या ओठांवरली गाणी..
माझा प्रत्येक श्वास.. माझा एकला ध्यास..
माझ्या वाटेवरली तु.. प्रेमाची ती आस...
वाचने
1288
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
खुपच सुंदर ! एकदम मंगेश
In reply to खुपच सुंदर ! एकदम मंगेश by गौरी लेले
धन्यवाद..
वा !