Skip to main content

फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू!!! - भाग २

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी बुधवार, 15/03/2017 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/39165 - भाग १ छान टुमदार बंगला अन त्यावर 'मनश्री' अशी पाटी, गेटमधून आत शिरतांच बहरलेली मोट्ठी बाग, अन दाराजवळ पोहोचताच येणारे थट्टा-मस्करी अन हसण्या-खिदळण्याचे आवाज! सारं काही अनपेक्षित होतं शशांकसाठी. त्यानं कल्पना केलेलं मनवाचं घर अगदी वेगळं होतं. आंत पोहोचला अन समोर पाहिलेल्या चित्राने अजूनंच चकित झाला. भल्यामोठ्या डायनिंग टेबलवर एका बाजूला एक आजीबाई बसल्या होत्या, मेथीची भाजी निवडत.

अंजलीची गोष्ट - दुसरी संधी

लेखक aanandinee यांनी बुधवार, 15/03/2017 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. अनास्थेटिस्ट बरोबर तिचं केसबद्दल बोलून झालं होतं. आता दोन तास निवांत वेळ होता. पण सकाळपासून उभं राहून ती थकली होती. दुपारचे तीन वाजले होते आणि आत्ता कुठे तिला बसायला फुरसत मिळाली होती. जेवायला जावं की चहाच मागवावा असा विचार करत ती हॉस्पिटल मधल्या तिच्या छोट्याश्या रूम मधे शांत बसली होती. इतक्यात नर्स आत डोकावली. "डॉक्टर एक पेशंट सकाळपासून थांबून आहे. तुम्हालाच भेटायचंय म्हणतोय" "काय मनीषा! आत्ता कुठे मी फ्री झाले आणि लगेच.... कोण आहे?" अंजलीने तक्रारीच्या सुरात विचारलं.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - आणखीन काही... (अंतिम भाग)

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 15/03/2017 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
१९७५ ते २०१५ या चाळीस वर्षांमधल्या ११ वर्ल्डकप्समधल्या अविस्मरणीय आणि थरारक अशा ४२ मॅचेसनंतर आणि वर्ल्डकपमधल्या जायंट किलर्स ठरलेल्या मॅचेसबद्दल लिहील्यावर विचार करताना असं जाणवलं की अद्यापही बरंच काही बाकी राहीलेलं आहे. एखाद्या बॅट्समनची अप्रतिम इनिंग्ज, एखाद्या बॉलरचा अचूक आणि तितकाच घातक स्पेल, अप्रतिम आणि अविश्वसनीय फिल्डींग, एखाद्या कॅप्टनची कल्पनेपेक्षाही यशस्वी ठरलेली चाल किंवा बूमरँगप्रमाणे उलटलेला निर्णय अशा कित्येक गोष्टी वर्ल्डकपमध्ये घडल्या आहेत.

शंकरकाका

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 15/03/2017 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
तशी शंकरकाकांची आठवण हल्ली क्वचीतच निघते. पण पितळी समई दिसली की हटकून शंकरकाका आठवतात. शंकरकाका आजोबांचे मित्र. रंगानं सावळे.अंगात भोका भोकांचं फाटकं गंजीफ्रॉक, गुडघ्याच्या वर गुंडाळलेलं मळकट पांढर धोतर, कानापाशी तेव्हढे पांढरे तुरळक केस. बाकी गुळगुळीत टक्कल. पांढऱ्या मिशीखाली जाड काळे ओठ, मान खाली झुकलेली. ते कधीच चपला वापरत नसत. अनवाणी फिरत. घरी आले की "तात्यानु" अशी घशात काहीतरी अडकल्यासारखी हाक मारत. ती ऐकल्यावर हे खाकरून का नाही घेत असं सारखं वाटत राही. पण त्यांचा आवाजच तसा होता. त्यांना खरूज होती. त्यामुळं ते घरात आलेले आज्जीला फारसं आवडत नसे.

एका बोक्याची गोष्ट भाग २

लेखक निलम बुचडे यांनी मंगळवार, 14/03/2017 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
एका बोक्याची गोष्ट - भाग २ बर्याच वर्षापूर्वी मी ही गोष्ट लिहायला घेतली होती. ज्या गोष्टीत आमच्याकडे असलेल्या एका बोक्याचा उल्लेख होता. त्यावेळी आमच्याकडे फक्त एकच बोका होता. आज एकूण ६ मांजरे आहेत. आमचा एक बोका सोडला तर इतर ५ मांजरे आम्ही स्वतः आणलेली नाहीत . ती आमच्याकडे कशी आली हे तुम्हाला वाचायला नक्की आवडेल. ही कहाणी मी आता नियमितपणे तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आधीची कहाणी पूर्ण करते, ज्याचा विषय आहे - आमचा बोका... आणि त्याचे बालपण... तर लहानपणी त्याने दूध पचत नसल्याने ६ महिने दुधाला तोंड लावले नव्हते.

रैना

लेखक arunjoshi123 यांनी मंगळवार, 14/03/2017 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्‍यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.

कामगार शक्तीचा.....

लेखक वरुण मोहिते यांनी मंगळवार, 14/03/2017 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
२०१०... पाहिलंच पोस्टिंग होतं अंदमान ला . या आधी गेलो नव्हतो तिकडे . ४-५ महिने राहायचं जरा वैताग आलेला . आर एपी डी आर पी चा प्रोजेक्ट होता . त्सुनामी नंतर . जावं लागलं बाहेर असताना ,मी परदेशात होतो तेव्हा काही दिवस तरी अचानक जावं लागलं . ते पण आपण फिरतो ते अंदमान नाही रंगत पासून मायाबंदर ते दिगलीपूर पर्यंत . सुरवातीचे ५-६ दिवस मजेत गेले . मायाबंदर ला शासकीय विश्रामगृह होतं राहायला . फिरून वैगरे मजा आली पोर्टब्लेयर ला पण . काम अवघड होतं त्यात मला बाहेरून अचानक इथे पाठवलेलं. मुख्य कंपनी सरकारी पॉवरग्रीड आणि कंत्राट आमच्या कंपनीला मिळालेलं.

फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू!!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी मंगळवार, 14/03/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टीची सुरुवात..... ‘Shashank, Could you do me a favor?’ ‘आता काय? काय राडा केला आहेस नवीन? नसत्या उठाठेवी करतोस अन मला निस्तरायला लावतोस. हे बघ....' 'अरे बाबा! काही उठाठेव नाही केलीये मी, एक कॅन्डीडेट येणार आहे संध्याकाळी तेव्हढं इंटरव्युव्हचं बघशील का?' 'अजिबात नाही! मला खूप कामं आहेत, प्रोजेक्टची डेडलाईन आहे. आज टाईमपास केला तर वीकेण्डला यावं लागेल. तुझं तू बघून घे. आणि काय रे, तू कुठे चालला आहेस? जायचंच होतं तर इंटरव्युव्ह उद्यासाठी ठेवायचा ना.' ‘अरे! शिल्पाचा बड्डे आहे आज, अन मी साफ विसरलो. मघाशी फोन करून परत कधींच भेटू नकोस म्हणाली.

नवीन नियमावली

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 14/03/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रशासनातर्फे नवीन नियमावली जारी करण्यात येत आहे. ती वाचून ध्यानात घ्यावी. काही अडचण, शंका असल्यास या धाग्यावर चर्चा करावी. बदलत्या काळात टिकून रहायचं असेल, प्रगती साधायची असेल तर बदल आवश्यक असतात. आजकाल सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, जुन्या कार्यपद्धती मागे पडून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. म्हणून आपणहीआपल्या जुनाट कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करत आहोत. १. सबंध भारतात झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यातल्या त्यात आपल्या बांधवांना प्रिय वड, पिंपळ, चिंच अशी झाडे तर दुर्मिळच म्हणावी लागतील. त्यामुळे निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंजलीची गोष्ट - थेरपी

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 14/03/2017 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा : गोष्टीची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि माझी लेखनशैली या दोन्हीमुळे माझ्या लिखाणात इंग्रजी शब्दांचा वापर अधिक असणार आहे. आपल्याला ते खटकत असेल तर कृपया या गोष्टी वाचण्यात वेळ वाया घालवूच नका . दादरसारख्या बिझी ठिकाणी त्या क्लीनिकचा पत्ता शोधणं थोडं अवघडच होतं पण शेवटी ती तिथे पोहोचली. "पण ते सायकियाट्रिस्ट आहेत की सायकॉलॉजिस्ट ?" अंजली नाना सबबी शोधत होती. "तुझ्या बाबांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हीच त्यांची डिग्री समज" बाबांच्या या बोलण्यावर आता काही उत्तरच नव्हतं.