Skip to main content

भास्करगड - हर्षगड ट्रेक

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी सोमवार, 13/03/2017 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
भास्करगड- हर्षगड १. भास्करगड भंडारदरा, घोटी परिसर म्हणजे किल्ल्यांचे, माहेरघर. पाबरगड, रतनगड, औंढा, पट्टा, कळसूबाई, अलंग- मदन-कुलंग पण त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतल्या अनेक दिवस खुणावणा-या हरिहरवर जाण्याचा योग आला नव्हता. मी, डॉक्टर आणि फॉरेस्ट अॉफिसर असे तिघेच जण शनिवारी रात्री साडे दहाला कळव्याहून निघालो.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - जायंट किलर्स

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 13/03/2017 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्डकपच्या इतिहासात अनेक अविस्मरणीय आणि थरारक मॅचेसबरोबरच काही कमालीच्या कंटाळवाण्या आणि एकतर्फी मॅचेसही अनेकदा झालेल्या आहेत. खासकरुन टेस्ट दर्जा असलेल्या संघांबरोबरच आयसीसीने क्रिकेटचा प्रसार करण्याच्या हेतूने टेस्ट दर्जा नसलेल्या संघांचाही वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यास सुरवात केल्यावर हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं, इतकं की २०१९ चा इंग्लंडमधला वर्ल्डकप हा १० देशांमध्येच खेळवण्याचा आयसीसी ने निर्णय घेतला आहे! हा निर्णय काहीसा वादग्रस्तं असला तरी निरर्थक मॅचेसची संख्या कमी होण्यास हातभार लावणारा आहे हे देखिल तितकंच खरं.

खिडकी पलीकडचं जग

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/03/2017 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकी पलीकडचं जग भाग १ गौरी नावासारखिच गोड, मोहक आणि बड़बडया स्वभावाची मुलगी होती. लाघवी आणि मित्र-मैत्रिणींचा मोठा परिवार असलेली. कायम पहिला नंबर वगैरे नाही... पण तशी हुशार म्हणण्या सारखी. आई-बाबांची एकुलती आणि लाडकी लेक. गौरी उत्तम चित्र काढायची. त्यामुळे शाळेतून तिला वेगवेगळ्या स्पर्धाना देखील पाठवाल जायचं. अनेकदा तिने शाळेला बक्षीस मिळवून दिल होत. त्या दिवशी गौरीची 10वी च्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे गौरी आणि तिच्या मैत्रिणी जाम खुशीत होत्या. सगळ्या मैत्रिणी मिळून जुहुला भटकायला जाणार होत्या. आता आपण कॉलेज मध्ये जाणार म्हणजे थोडे मोठे झालो अस सगळ्यांच्याच मनात होत.

किमया

लेखक संदीप-लेले यांनी सोमवार, 13/03/2017 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
यान झेपावले, त्याने धरा सोडली ते पाहण्या, जगाने मान उंचावली शत विसुक्ष्म ग्रह, स्थिरावले कक्षी ना उसंत, त्यांनीही मान उंचावली डॉलर घेउनी, सेवा जगाला दिली आज रुपयानेही मान उंचावली अद्भुत अजब किमया पाहून ही डोळे पाणावले नी मान उंचावली
काव्यरस

मुळांनी जमिनीशी अबोला धरून-- संदीप चांदणे

लेखक शरद यांनी सोमवार, 13/03/2017 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज सत्तरच्या आसपास वय असलेल्या पिढीतील माणसांची परिस्थिती विचित्र झाली आहे. ते लहानपणी ज्या मध्यमवर्गीय वातावरणात वाढले ते आता कल्पनेतले विश्व झाले आहे. त्यांनी लहानपणी आई-वडिलांचे फटके खाल्ले, मोठ्या भावाचे शर्ट वापरले, जुनी पाठ्यपुस्तकेच शाळेत नेली. घरातली कुठलीही गोष्ट सर्वांनी वाटून घेतली, पण यात काही गैर आहे, असे कधी त्यांना वाटलेच नाही. घरात वडीलधार्‍या माणसांचे प्रेम, थोरल्या भावा-बहिणीची माया ममता यांचे न दिसणारे पण आश्वासक असे कवच घराच्या सगळ्या वातावरणात भ्ररलेलेच असे. भांडणे, रुसवे-फुगवे असतच पण त्याची मर्यादा काय असावी हेही आपोआप कळत असे.

तुझे रंग

लेखक परशु सोंडगे यांनी सोमवार, 13/03/2017 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे रंग माझ्यात विरघळून गेलेत जसे स्वच्छ पाण्यात अलगद पांगत जावेत रंग.... आता तुझे रंग कोणते आणि माझे रंग कोणते मला कुठं ओळखता येतात ? तुझ्यात माझे विरघळलेले रंग मलाच ओळखता येत नाही हे तू नुसता पहात हासत राहिलास.. तुझ्या चेह-यावर पांगत गेलेले हासण्याचेते चावट रंग तुला तरी कुठं लपवता आले ? माझे तुझ्यात मिसळलेले रंग अलिप्त करावं म्हटलं तर... ते कुठं शक्य होतं आता. अख्ख जाळावचं लागेल माझे मला मी जळून जळून गेल्यावर उरतील खाली रंग माझ्या अस्तित्वाचे साक्षीदार... म्हणून..... त्यामुळे मी आता त्या फंदयातच नाही पडतं.. नुसतं रंगात चिंब चिंब भिजत राहते. आपण होऊनचं. कायम रंगीतच राहते मी.... तुझे....र
काव्यरस

मिपा शिमगा २०१७ : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/03/2017 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....! *आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो. *मिपावर काटछाट करणार्‍या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्‍या संपादकांच्या नावाने रे भो...! *खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो. *मिपाच्या बॅनर बनविणार्‍याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो. * काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो. * साहित्य संपादकांच्या वात आणनार्‍या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो.

मरासिम

लेखक मिडास यांनी सोमवार, 13/03/2017 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला. कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है. त्या वेळेला शब्द समजले नाहीत. पण काहीतरी लक्कन हललं होतं आतपर्यंत. मुळात उर्दू हि भाषाच तशी आहे. प्रियकराने प्रेयसीबद्दल बोलावे तर फक्त उर्दूमधूनच हा माझा ग्रह आजतागायत कायम आहे.

टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का?

लेखक ट्रेड मार्क यांनी रविवार, 12/03/2017 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का? मला तिथल्या वास्तव्याविषयी थोडी माहिती पाहिजे.

रंग

लेखक परशु सोंडगे यांनी रविवार, 12/03/2017 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीचे कान्हा तू जरा समजून घे. उधळून जीवास मी रंग माझे शोषून घे. मी चिंब रंगी तुझ्या बासरी दिल छेडते. रंगबावरी मी राधा सुराच्या रंगी न्हाते. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928
काव्यरस