अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १
अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग ३
लवकर झोपी गेल्यामुळे मला दुसर्या दिवशी पहाटे ४ लाच जाग आली. उठल्यावर माझं घड्याळ बिघडलय का काय झालय हे कळेचना थोडा वेळ. सुर्य उगवायला लागला होता. मग लक्षात आलं की काल ५.३० लाच अंधारुन आलं होतं!! मग काय नवरोबाला उठवला लगेच पटपट आवरलं आणि पोर्ट ब्लेअर च्या आबर्दीन जेट्टी कडे गेलो.
आम्हाला थोडक्यासाठी एक सुंदर सुर्योदय चुकला होता, म्हंटल जाऊदेत आता उद्या पाहुयाच. बराच वेळ तिथे घालवल्यावर मग मन मारेल तस आणि रस्ता फुटतो तिथे भटकायचं ठरवलं आणि बाईक घेऊन आम्ही निघालोच. हे त्या वाटेतले काही फोटो.
ही आबर्दीन जेटी
हे जहाज बहुतेक हॅवलॉक ला निघालय
हे नॉर्थ बे बेट. ह्याला तुम्ही कुठेतरी पाहिलय (नक्की), आठवतय का काही?
आता आम्ही कोर्बिन्स कोव्ह बीच च्या रस्त्याला लागलो होतो
कोर्बिन्स कोव्ह बीच ची किनारपट्टी
कोर्बिन्स कोव्ह बीच
इथे थोडावेळ क्लिकक्लिकाट करुन पुढच्या रस्त्याला लागलो. कुठे वगैरे काही माहित नाही. वाटेत कित्येक खेडी लागली. त्या खेड्यातल्या वस्त्या, घरं, जनावरं, आणि मुख्य म्हणजे तिथले लोक यांच निरीक्षण करत आम्ही जात होतो. अंदमानी लोक खूप भोळे-भाबडे, मदतीला अत्यंत तत्पर, नियमप्रिय, प्रामाणिक , मायाळु आहेत. आपल्या घरांमधे कोणतीही भाषा का बोलेनात तुमच्याशी अगदी अस्खलित हिंदी बोलतात. जिथे जिथे आम्ही वाटेत थांबलो तिथे तिथे लोकांनी आमची चौकशी केली. आम्हाला काही हव नको ते विचारलं. ह्यामागे त्यांची कोणतीही अपेक्षा नव्हती. मला खरं सांगायचं तर त्या प्रेमाने अगदी भरून आलं.
या बेटांवर अजूनही ठिकठिकाणी त्सुनामीच्या वाताहातीच्या खुणा दिसतात. अर्थात लोकांची घरं , उडलेली छपरं , जहाजं वगैरे दुरुस्त झालीत पण तेव्हा पडलेल्या मोठमोठाल्या झाडांचे ओंडके, समुद्राच्या वाढलेल्या पातळीमुळे बुडलेले रस्ते आणि मग बांधलेले नवे रस्ते ई. इथे झालेल्या वाताहातीचा अंदाज येतो. अश्याच एका पडलेल्या झाडाचा ओंडका.
हे महाशय बराच वेळ लपाछपी झाल्यानंतर असे सापडले
मला नेहमी नव्या प्रदेशात गेल्यावर तिथल्या लोकांबद्दल, त्यांच्या घरांबद्दल, संस्कृतीबद्दल खूप जाणून घ्यायचं असतं .ही अंदमानमधली काही घरं. ही घरं बघितल्यावर मला "गोव्याची" सय आलीच. अंदमानी लोकही आमच्या गोवेकरांसारखे रंगांच्या प्रेमात आहेत. अंदमान अजुन एका अंगाने माझा वाटायला लागला.
इथे एकही नदी नाहीये. मात्र पावसाच्या पाण्याला ते साठवतात
ही खरंतर एका मिडल स्कूल ची इमारत आहे. तिचं काम पाहिलत का? लाकडी आहे ती शाळा. पारंपारिक अंदमानी घरं अशीच असतात लाकडाची. ओट्यापासुन जमिनीपर्यंत सगळं लाकडाचं. सुनामीनंतर लोकं काँक्रिटची घरं बांधु लागले आहेत
अंदमानी मगरी कुठेही आढळु शकतात त्यामुळे प्रवाश्यांना त्रास होऊ नये म्हणून अश्या जाळ्या/ तारा लावल्या आहेत
इथे डाव्या बाजुला एक चौथरा दिसतोय का तुम्हाला? हे टुरिस्ट हेल्प सेंटर क्म वॉशरुम होतं. सुनामीनंतर समुद्राने आपली पातळी ओलांडली, आता ते भरतीला पुर्ण बुडतं. ओहोटीला दिसतं. तिथला खर तर सगळ्या किनारी भागातला रस्ता धुऊन गेला होता, आता समुद्राच्या नव्या मर्यादेनुसार पुन्हा व्यवस्थित बांधलाय .
ही सुद्धा एक सरकारी शाळाच आहे. नो युनिफॉर्म!! इतक्या मस्त शाळेत मला आवडेल बाबा शिकायला.
केवढाले वृक्ष होते एकेक. हे उगाच माझ्या क्षुद्रतेच्या अंदाजासाठी. हे मूळ आहे फक्त झाडाचं जे सुनामी मधे मुळासकट उपटुन गेलं होतं.
हे सगळे मला माझेच वाटु लागले. माझ्या एकेकाळच्या गोव्यासारखेच डोंगर,झाडं, समुद्र तर होते इथे. पण ते खरच गोव्यासारखे होते का? खरं सांगायचं तर गोव्याहुनही खूप जास्त सुंदर आणि श्रीमंत !!! अंदमानला समुद्र इतका श्रीमंत आहे, तुम्हाला कोणत्याही किनार्यावर मेलेले /जिवंत कोरल्स दिसु शकतात.
क्रमशः
हे सगळे मला माझेच वाटु लागले. माझ्या एकेकाळच्या गोव्यासारखेच डोंगर,झाडं, समुद्र तर होते इथे. पण ते खरच गोव्यासारखे होते का? खरं सांगायचं तर गोव्याहुनही खूप जास्त सुंदर आणि श्रीमंत !!! अंदमानला समुद्र इतका श्रीमंत आहे, तुम्हाला कोणत्याही किनार्यावर मेलेले /जिवंत कोरल्स दिसु शकतात.
वाचने
10392
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय भारी फोटो काढलेत. सहीच
सुंदर !
छान
दादुस मी यावेळी हॅवलॊक ला
In reply to छान by गॅरी ट्रुमन
वाचनखूण!
नक्की जायचय. पण हा लागोपाठ
In reply to वाचनखूण! by आदूबाळ
झकास!
अठ्ठावीस वर्षांपूर्वी अंदमान
मस्त मालिका
हो हो. मी स्वतः शाकाहारी
In reply to मस्त मालिका by धर्मराजमुटके
वाह...हाही भाग अतिशय आवडला.
भाग आवडला. आम्हाला अंदमानला
मस्त झालाय हाही भाग.
भारतातल्या २० रु. च्या नोटवर.
In reply to मस्त झालाय हाही भाग. by रुपी
मस्त झालाय हाही भाग! पुभाप्र!
भारी आहे अंदमान
छानेत फोटो आणि वर्णन...!
कसलं सुंदर आहे हे!!
छान झालाय हाही भाग.. वाचते
पावसाळ्यात जॉलीबॉय आणि इतर
मी गेले त्यादिवसापासून तीन
In reply to पावसाळ्यात जॉलीबॉय आणि इतर by गवि
फोटो सुंदर!
अप्पा जोगळेकर, डॉ सुहास
वाह, एक नंबर वृतांत ! फोटो
वाह, एक नंबर वृतांत ! फोटो
ते दगड नाहीयेत अहो. मेलेले
In reply to वाह, एक नंबर वृतांत ! फोटो by चौथा कोनाडा