Skip to main content

ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा

लेखक कौशिक लेले यांनी शुक्रवार, 13/10/2017 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
अमराठी लोकांना ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी मिपावर सांगितले होते. मिपा लेख १ मिपा लेख २ त्याच अनुषंगाने माझ्या नवीन कामाची ओळख मिपाकरांना करून देण्याची माझी इच्छा आहे. २ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा मी आजपासून सुरू केली आहे- "क्रियापद रूपावली". अर्थात एका क्रियापदाची वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या सर्वनामांसाठीची रूपे किंवा तसेच वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रूपे दाखवणारे संकेतस्थळ.

नवी मैत्री

लेखक तृप्ति २३ यांनी शुक्रवार, 13/10/2017 00:10 या दिवशी प्रकाशित केले.

नवी मैत्री

नवी मैत्री आहे पण आहे खूप सुंदर कुठे ही असलो तरी कुणीच कोणाला देऊ नका अंतर.... आपलं ते गोड़ गुपित एकमेकींना सहज पणे बोलून गेलो तुझे तेच माझे म्हणत एकमेकींमध्ये रमत गेलो... नवीन आहे आपली मैत्री तरी जपतोय आपण फुलासारखी कायमच एकमेकींना साथ देऊ एकमेकींच्या आनंदासाठी. तृप्ती समीर टिल्लू http://www.truptiskavita.com

विचित्रगड - रोहिडा

लेखक हकु यांनी गुरुवार, 12/10/2017 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या भल्या थोरल्या किल्ल्याची लहानशी प्रतिकृती वाटावा असा आणि 'किल्ला' असण्याच्या सर्व अटी पूर्ण करणारा लहानसाच पण अतिशय सुबक, सुंदर आणि टुमदार असा किल्ला म्हणजे 'विचित्रगड', अर्थात रोहिडा. अश्या किल्ल्याला 'विचित्रगड' का म्हणालं गेलं असावं हे अजून तरी मला न सुटलेलं कोडं आहे. रोहिडा, रायरेश्वर आणि केंजळगड असे ३ किल्ले २ दिवसात असा बेत ठरला. पण काही घरगुती कारणांमुळे मी मात्र फक्त रोहिडाच करण्याच्या उद्देशाने निघालो. कल्याणहून रात्री पुणे आणि पहाटे स्वारगेट गाठलं. ५.३० ला भोर कडे जाणारी पहिली एसटी आहे कळलं. ५.४५ ला ती निघाली आणि ६.५५ ला भोर एसटी स्थानकावर पोहोचली.

सख्या कशी कुठून रोज काढतोस भांडणे

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 12/10/2017 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा आहेच - http://www.misalpav.com/node/41200 हळूच सोडतोस पुडी, तेच तेच कुंथणे सख्या कशी कुठून रोज काढतोस भांडणे क्रूर तक्रार करी मौनही कसे तुझे अरे किती उरात खोल मारतोस भांडणे बनून शल्य चोरतोस झोप रोजचीच तू विचारताच सांगतोस रोजचीच भांडणे पिसाट अनल तू बनून हिंडतोस रात्रभर पहाट वेळीही कसे आठवते भांडणे मधाळ चांद वितळतो, रसाळ रात वाहते अरे कुण्या सुरात रे, उकरतोस भांडणे नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा मिठीत ये कधीतरी विसरशील भांडणे
काव्यरस

योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

लेखक मार्गी यांनी बुधवार, 11/10/2017 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे) २८ सप्टेंबर. सकाळी लवकर उठून जायचं आहे. आज पहिला दिवस आहे, पण सामान बांधणं, सगळ्या गोष्टी तयार ठेवणं ह्याची तयारी आधीच केली आहे. त्यामुळे सकाळी आरामात निघू शकलो. मन खूप शांत आहे. कालपासून काहीच तणाव नाही आहे. नेहमीचीच बाब आहे, असं वाटतंय. उजाडायच्या आधी पावणे सहाला निघालो. आजचा टप्पा छोटासाच आहे. पूर्वी अनेकदा ह्या मार्गावर गेलो आहे.

खरं खरं सांगा

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 11/10/2017 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना? उच्चार नसाल करत भले, पण एक रेखा असते ना?
काव्यरस

धरणीचे मनोगत

लेखक वैभवदातार यांनी बुधवार, 11/10/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
हे गगनराजा , थांबव तव उष्ण किरण शरा तव ऊर्जेने मज दाह होतो विनविते तुजला आज धरा उष्ण वात वाहती भवती तप्त ऊन पडे निष्पर्ण त्या वृक्ष लताना पाहुनी धरणी रडे शुष्क होती नद्या जलाशय तडफडती त्यात जलचरे एकमात्र ह्या थेंबासाठी शांत विहग चहूकडे विचरे वासरमणी, तुझिया योगे जलचक्र फिरते ज्ञात आहे मला परी तल्खली होई जीवाची कशी समजावू मी तुला? तव अनलशरे तनूसी भेगा आता किती मी साहू? हे दिनमणी न कळे मजला तुजवीण कोणा मी पाहू? करद्वय जोडुनी नमिते तुजला थांबव हे तप्त आप वरुणराजा बरसआता शमवि मम शरीर ताप ---- शब्दांकित वैभव दातार

लेखकाची थेट भेट !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 11/10/2017 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात. साहित्याच्या प्रांतात लेखक व वाचक हे दोन परस्परावलंबी घटक आहेत.

एका रात्रीचा थरार

लेखक लाल गेंडा यांनी बुधवार, 11/10/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिनेशने वडापावचा मोठ्ठा घास घेतला आणि समोर बसलेल्या दीनुकाकांकडे पाहिलं. साठीत पण म्हातारा चुणचुणीत होता. डोळ्यातलं तेज जरासं उतरल्यासारखं वाटत होतं पण खरं किती होत तेच जाणे. दिनेशला इथे येऊन दहाच दिवस झाले होते. या दहा दिवसांत दिनूकाकांनी त्याला नोकरीच्या सगळ्या खाचाखोचा समजवून दिल्या होत्या. त्यांचं अख्ख आयुष्य चौकीदारीत गेलं होतं. कोकण सुरू होतो घाटांनंतर तिथलं पहिलं गाव हे. एका बाजूला घनदाट जंगल, डोंगर, त्याच्या दर्या-खोऱ्या आणि दुसऱ्या बाजूला त्यातून वाहणारी ती छानशी सुबक पण छोटीशी नदी. दिनेशला पहिल्या फटक्यातच सगळं आवडलं होत.

जुळ्यांचं दुखणं!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 10/10/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
'जुळ्यांचं दुखणं' हा शब्दप्रयोग आधी खूप वेळा ऐकला होता पण त्याचा अर्थ समजू लागला ते आमच्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर. त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की जुळ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडे बहुतांश लोकांना काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न. माझ्या मते, आजकाल जुळ्यांचं प्रमाण वाढलं आहे ते वंध्यत्व(infertility) साठी घेतल्या जाणाऱ्या थोड्या आक्रमक(!) उपचार पद्धतीमुळे. बऱ्याच डॉक्टर लोकांशी झालेल्या बोलण्यातून असं समजलं की हे उपचार चालू असतील तर २-३ गर्भ राहणं खूप कॉमन आहे. आमच्या बाबतीत तेच झालं असावं.