Skip to main content

स्व - राष्ट्र..!!

लेखक राघव यांनी बुधवार, 12/06/2019 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून घोळत असलेल्या काही ओळी, पूर्ण होऊनही आता महिना उलटत आला.. आणिक काही सुचतंय का हे बघत होतो.. पण नाही सुचले. म्हणून मग आता प्रकाशित करतोय. संदर्भः उन्हाळ्यात आमच्या सोसायटीत पाणी कमी पडतं म्हणून टँकरनं पाणी भरणं चालू होतं. सकाळी ६ तास व संध्याकाली ६ तास असं. पण नंतर २४ तास पाणी असायला हवं... मग त्यासाठी जेवढे टँकर्स लागतील तेवढे बोलवावेत असं ठरवण्यात आलं. ५०-६० जणांच्या मिटिंगमधे मी धरून केवळ ३ जण म्हणत होतो की पाण्याचं रेशनिंग असावं. पण कुणीही ऐकलं नाही. दिवसाला कमीतकमी १० टँकर्स लागत होतेत २ महिने. त्या मिटिंगमधे मी बोललो होतो की, अरे थोडी तरी लाज वाटायला हवी आपल्याला..

दोसतार - २१

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 12/06/2019 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/44307
मी काय काय बोलत होतो आणि आई ते ऐकत होती. त्यावेळी माझ्या पेक्षा माझा चेहेराच कदाचित जास्त बोलत असावा. कारण आईचे माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या चेहेर्‍याकडेच जास्त लक्ष्य होते. सोमवारी सहलीला जायचे या विचारांनीच माझ्या चेहेर्‍यावर काहितरी मजेदार रंगीत रांगोळी उमटत असावी. माझ्यासारखीच ,आई पण त्या नक्षीत हरवून गेली.
यवतेश्वर म्हणजे धगांचा डोंगर. पाटणला असताना पाऊस खूप असायचा. कधीतरी कोयनानगरला गेलो तर जंगली जयगड चा डोंगर ढगात झाकलेला दिसायचा पण त्या ढगात कधी गेलो नव्हतो.

बालमित्रांची सुट्टी....

लेखक bhagwatblog यांनी बुधवार, 12/06/2019 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
करू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी करू थोडा खेळ, बसला आता मेळ करू थोडी मज्जा, लागली आहे सुट्टी भावा सोबत दंगा, मामा सोबत पंगा दादा सोबत कुस्ती, लागली आहे सुट्टी दीदीची काढली खोड, कॉर्टूनला नाही तोड जाईल सर्व सुस्ती, लागली आहे सुट्टी आज्जी करते थाट, आजोबा म्हणतात माठ मावशी सोबत गट्टी, लागली आहे सुट्टी दिवस गेला छान, रात्रीने टाकली मान खेळाला आत्ता बुट्टी, संपेल आत्ता सुट्टी
काव्यरस

बालकथा - पहिला प्रवास

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 12/06/2019 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा - पहिला प्रवास ही बालकथा आहे . ( छोटा वयोगट ). मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी . खास उन्हाळी सुट्टीनिमित्त . मला मुलांच्या प्रतिक्रिया कळवा हं . .. आवर्जून ! आणि तुमच्या सुद्धा . --------------------------------------------------------------------------------------------------------------------- पहिला प्रवास -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- राजूच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी होती. तो मामाच्या गावी निघाला होता. त्याचा मामा मुंबईला राहायचा. त्याने हिरव्या रंगाचा टी शर्ट घातला होता.

"फार काय"

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 12/06/2019 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
======= कुत्र्यांसाठी कपडे आले. फार काय, बो, टाय, टीशर्ट घालुन बड्डे पार्टीसाठी श्वान सजले. कुत्र्यांसाठी न्हावी आले, तसेच ॲण्ड्रोईड गेम्स आले. फार काय; "जुजबी" प्रियराधनासाठी पेट्स-पार्क्स आले. कुत्री कोडी सोडवु लागली बेरजा वजाबाक्या करू लागली मालकाला खूश करण्यासाठी I love you सुद्धा म्हणुन लागली. फार काय, सुंदर मालकीणीशी संभोगाचा आनंद पण लुटु लागली! एव्हढे सगळे होऊनही खांब आल्यावर तंगडी वर होणे थांबले नाही. फार काय, कुत्र्याचा माणुस इतक्यात काही होणे नाही! - युयुत्सु

जागरण....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/06/2019 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली. आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली. अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग! बागडू लागलं,खेळू लागलं, माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

अज्ञाताच्या काठावर

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 11/06/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताच्या काठावर शब्द होताना धूसर अर्थ निरर्थाचे द्वैत कल्लोळून झाले शांत अदृष्टाच्या नजरेला दिठी भिडविण्या आलो अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य उंबर्‍याशी थबकलो अथांगाच्या डोहावर अनाहताचे तरंग नश्वराच्या ओठावर चिरंतनाचे अभंग
काव्यरस

शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -३

लेखक माहितगार यांनी सोमवार, 10/06/2019 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे - २ हा धागा लेखात पुरेशा भाषा तज्ञांचे दाखले नमुद केल्या नंतर क्रमांक ३ चा लेख टाकण्याचा प्रसंग इतक्यात माझ्यावर येईल असे माझे मलाही वाटले नव्हते.

भविष्याचे भूत...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 10/06/2019 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
अंगावर भयचकिताचा सरसरीत काटा येणे म्हणजे काय ते आज अक्षरश: अनुभवास आले. रोजच्या राजकारण आणि भक्तरुग्ण वादाची झिंग एका झटक्यात उतरली, आणि मन भानावर आलं. असं काही झालं, की आपोआप सहावे इंद्रिय जागे होते, आणि भविष्य जणू भेसूर होऊन वर्तमानाच्या रूपाने विक्राळपणे समोर येते.

वळीव

लेखक महासंग्राम यांनी रविवार, 09/06/2019 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
समजतो वळवाला पावसाळा, शहराला गावाचे दुःख ठाव नाही
काव्यरस