Skip to main content

पाय सरावले रस्त्याला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 02/09/2019 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
-: पाय सरावले रस्त्याला :- मी चाललो, चाललो इतका की रस्ता ओळखीचा झाला दुसरी वाट धरावी तर पाय सरावले रस्त्याला ||ध्रू|| खाच खळगे नेहमीचे झाले नवे नव्हते वाटले अडथळे तसेच होते पायात काटे खुपसले काट्यांनी तरी जावे कोठे त्यांना कोण सोबती मिळाला? पाय सरावले रस्त्याला ||१|| अडचणी अनंत आल्या उभ्या राहील्या समोर नेट लावून सामोरी गेलो प्रश्न अनेक पुढे कठोर जंजाळ पसरले समोर असता एक पक्षी अचूक उडाला पाय सरावले रस्त्याला ||२|| "कसा आहेस तू ठिक आहेस ना?" "मदत लागली काही तर मी तयार आहे ना!" ना कुणी अशी उभारी दिली काय करायचे त्या ओळखीला? पाय सरावले रस्त्याला ||३|| मीच माझी केली मदत मग हात केला मलाच

जीवनाचे धडे

लेखक मिलिंद जोशी यांनी रविवार, 01/09/2019 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
काल बऱ्याच दिवसांनी माझ्या वर्गमित्राचा फोन आला होता. भरपूर गप्पा झाल्या. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तशा अनेक खपल्याही निघाल्या. “काय म्हणताहेत तुझी मुलंबाळं?” मी नेहमीचा प्रश्न विचारला आणि तो एकाएकी गंभीर झाला. “यार... बरं झालं तू लग्न केलं नाहीस...” त्याने म्हटले आणि मी चाट पडलो. खरंय ना... जो माणूस ‘मिल्या... तूही उरकून टाक आता... किती दिवस संट्या राहणार?’ असं म्हणायचा त्याच्याकडून असे वाक्य अपेक्षितच नव्हते. “कारे? काय झालं?” मी थोडं गंभीर होत विचारलं. “यार... माझा मुलगा मागील वर्षी दहावीला होता. खूप हुशार आहे तो.

साध्वी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/09/2019 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे लेखकाचा मोबाईल वाजला. लेखकाने स्क्रीनवर पाहिलं. नंबर होता. फोनमध्ये सेव्ह नव्हता. फोन घेत लेखक म्हणाले, ‘नमस्कार.’ ‘सोनवणे साहेब, तुम्ही आश्रमात येताहेत ना. कार्यक्रम सुरू होत आहे साहेब.’ तिकडून खूप घाईत असलेली महिला बोलत होती. लेखक म्हणाले, ‘कोण हवंय तुम्हाला?’ ‘मी सुमनताई बोलते. सोनवणे नगराध्यक्ष साहेबांचा फोन आहे ना?’ लेखक म्हणाले, ‘नाही.’ ‘कोण बोलताय आपण?’ ‘सुधाकर पाटील’ ‘हा नंबर सोनवणे साहेबांचा नाही?’ ‘नाही’ ‘नंबर तर सेव्ह आहे माझ्याकडे’ म्हणत फोन कट झाला. पाच सहा दिवसांनी लेखकाला याच नंबर वरून पुन्हा फोन आला.

संध्याकाळी तू गंगेतीरी

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 01/09/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

तंबोरा' एक जीवलग - ३

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शनिवार, 31/08/2019 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात उल्लेख केलेली हकीकत आधी सांगते. महाराष्ट्रातलं एक गाव होतं. तिथं रामनवमीचा उत्सव असायचा. म्हणजे अजूनही असेल. पण ही हकीकत अंदाजे चाळीस वर्षा पूर्वीची. तिथं उत्सवात दरवर्षी आई गायची. दरवर्षी न चुकता गाण्याला बोलवायचेच ते लोक. उत्सवाच्या दोन महिने आधी त्यांचं पत्र यायच. आई गेली त्या नंतरच्या वर्षी सुद्धा त्यांचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं. "गेल्या वर्षा पर्यंत बाई गात होत्या. चिक्कार वर्ष सेवा घडली त्यांच्याकडून. खर तर त्या गेल्याला अजून वर्ष झालेलं नाही. पण ही परंपरा सोडू नका. बाईंच्या ऐवजी तुम्ही गाणं करा." त्यांचं म्हणण खरं होतं. ती लोकंही सज्जन होती.