Skip to main content

दोसतार - ४७

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 22/05/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक एक गार वार्‍याची झुळूक आली. डोक्यावर लिंबाचे पान पडले म्हणून वर पाहिले. काळेभोर आकाश पूर्ण चांदण्याने भरले होते. आकाशात दिवाळी होत असावी इतके. तिथे वीस ठिपके वीस ओळी पेक्षाही मोठ्टी रांगोळी काढलेली होती. मी तानुमामाला ती रांगोळी दाखवली. तानुमामा म्हणाला आपल्या रांगोळीला उत्तर म्हणून आज्जी तेथे रांगोळी काढतेय . खरंच असेल ते. नाहीतरी इतकी सुंदर रांगोळी आज्जीशिवाय दुसरे कोण काढणार होते.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46822 अंगणात दिवाळीचा किल्ला बनलाच नाही. अंगणात फटाके ही वाजवावेसे वाटले नाही. नुसता कचरा.

महर्षी गीता - भगवान रमण महर्षी कृत गीता-सार

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 22/05/2020 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी भगवद्गीता १०.२० या श्लोकाचा उल्लेख केला होता: जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात (श्री स्वामी स्वरूपानंद कृत श्रीमत भावार्थ गीता १०.२०) पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (त्यात हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो).

पहिलीच माझी कविता...

लेखक कादंबरी... यांनी गुरुवार, 21/05/2020 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: पोहे मात्र सुरेख झाले https://misalpav.com/node/46836 आहेत शब्द साधे, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली उसने घेतले शब्द, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली वाचले नाही कोणी, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली नाही केली वाहवा, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली असतील चार कडवे, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली पहिलीच माझी कविता, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली

वासुकाका

लेखक अभिबाबा यांनी गुरुवार, 21/05/2020 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
वासुकाका आमच्या आधीच्या अर्ध्या पिढीतले. . . आयुष्याच्या अर्ध्यावरच गेले. . . किरकोळ बांधा व सरळ लांब केस.पण जात चाललेले केस मागे घेऊन तेल लावून ते चापून चोपून बसवण्याच्या वासू काकांचा नेहमीचाच खटाटोप. एक पांढरा सदरा व स्वच्छ लेंगा. आपल्या शरीराच्या रंगाशी असलेल कॉन्ट्रास्ट मॅचिंग त्यानी आयुष्यभर बाळगलं, अगदी पांढऱ्या समुद्रावरच्या भागोजी शेठ कीर वैकुंठ धामापर्यंत ! एकूणच वासु काकांचा नीटनेटके राहण्याकडे कल होता.त्यांनी ना कधी कसले व्यसन केले ना कसला शैाक केला.पण नाटके पहाण्याचा छंद मात्र त्यांनी जोपासला.

[शतशब्दकथा] Everything is fair in business and politics

लेखक SaurabhD यांनी गुरुवार, 21/05/2020 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला तर माहितीच आहे ... कथा खरंच पूर्णपणे काल्पनिकच आहे. वस्तुस्थितीशी ह्याचा अजिबात काहीही संबंध नाही ... आणि देव करो, आणि कधीच काही संबंध येऊ पण नये ... बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहातच ... ------------------ प्रोजेक्ट डेमो नंतर काही काळाने ... "मानलं तुम्हाला डॉक्टर, खरंच जबरदस्त आहे तुमचं डिझाईन. तुमचा विशेष सन्मान केला जाईल ... गुप्तपणे ..." "थँक्यू सर ..." "तुमच्या औषधाने पण चोख काम केलं आहे." "थँक्यू सर ... पण आपण ते औषध इतर देशांना का नाही विकत ?

मागे वळुन पाहताना..

लेखक मन्या ऽ यांनी बुधवार, 20/05/2020 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळून पाहताना.. मागे वळुन पाहताना एक निरागस चेहरा दिसतो मज मनसोक्त खळखळुन हसताना मागे वळुन पाहताना तोच चेहरा दिसतो मज भेदरलेल्या डोळ्यांनी आसपास पाहताना मागे वळुन पाहताना लोकांचे चेहेरे न्याहाळताना तो चेहरा दिसे मज ओंगळवाण्या नजरा सहन करताना मागे वळुन पाहताना ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे पाहिले मी मुखवटे एकावर एक चढवताना मागे वळुन पाहताना स्वतःला आरशात बघताना पाहिले आहे मी स्वतःचीच किळस करताना मागे वळुन पाहताना ते स्पर्श सहन करताना पाहिले आहे मी स्वतःलाच तीळ तीळ तुटताना मागे वळुन पाहताना रोज रोज मरताना पाहिले आहे मी स्वतःलाच नैराश्याच्या खाईत झोकताना मागे वळुन पाहताना आज

प्राक्तनवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 20/05/2020 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजाच्या पुसती रेषा अंधार जसा दरवळतो. काळीज कुणाचे रडते चंद्र कुणाचा विव्हळतो. काळाकडे घ्याव्या मागून त्या हळव्या प्राक्तनवेळा. विस्मृतीस कराव्या अर्पण सुगंधी दुःखांच्या माळा. रंगीत करावे डोळे श्वासांना यावी भरती. उगवून पुन्हा जन्मावे पाऊस पडल्यावरती. -कौस्तुभ

रत्नाकर मतकरी : अ‍ॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 20/05/2020 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नाकर मतकरी : अ‍ॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने नुकतंच ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा धागा निघालेला आहे, आणि मिपाकरांनी त्यावर भावना व्यक्त केल्या आहेत ! मतकरींच्या कथा वाचताना अचानकपणे अक्षर दिवाळी अंकात त्यांच्या अ‍ॅडम या कादंबरीची भेट झाली ! त्यातील शृंगारिक वर्णने वाचून चळायला झालं. सुरुवातीच्या काही पानांनंतर कादंबरीचे मनाचा ताबाच घेतला. दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवरील पात्रांनी मनात घर केले.

हसण्या उसंत नाही

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 20/05/2020 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त