Skip to main content

गणित!-२

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 22/10/2009 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या नवे लेखन यादीत डोकवता 'शामो' स्वतःशीच म्हणाला, "(गणित),दहाजणीत!,अगणीत>,((गणित)),(झिरो), झणझणीत,[गणित!] ,सणसणीत>>>>,[वळीत] - विडंबन झाली का पूर्ण?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंदका आणि सहज एक विचार डोकावला... *** खेद लपवून वाचताना यादीवर पाहिलं त्यांन तेव्हा 'विडंबनां'ची त्याला एक संख्या दिसली... दिसणं, आणि असणं या जालाचा नियम उमजेपर्यंत तो हरला... मुळ कवितेचे प्रतिसाद मोजले तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती संख्या म्हणाली, "येव्हडीतर विडंबने झालीत!" रचना: केव्हातरी, २००९

[वळीत]

लेखक अमृतांजन यांनी गुरुवार, 22/10/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुरं वळवत फिरतांना वीराप्पा स्वतःशीच म्हणाला, "वकटी, रंडू, मोडू, नायडू- पाचाचे चार कसे झाले करडू?" झोल मिटेनासा झाला तेव्हा, शिवी हासडून दिला दंडूका मोती कुत्रा जाम कळवळला... *** सुन्न होऊन परततांना मागं पाहिलं वीराप्पानं तेव्हा अंधारातही त्याला एक सावली दिसली... लपणं आणि छपणं या लपाछपीचे नियम कळत असुनही त्याला उमजेपर्यंत तो हरला... उंचावत दंडूका तोच वीरप्पा ओरडला तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती सावली म्हणाली, "मीच तुझे चुकलेले करडू!"
काव्यरस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल २००९

लेखक नि३ यांनी गुरुवार, 22/10/2009 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचे निकाल आज जाहीर झाले. आतापर्यंत हाती आलेल्या वृत्त्तानुसार आघाडी सरकार तिसर्यांदा सरकार स्थापीत करणार असे स्पष्ट दिसत आहे. आघाडी सरकार -- १४७ युती --- ९४ मनसे --- १३ ईतर --- ३४ मनसे ने पुन्हा मुसंडी मारली आहे आणी १३ जागा ह्स्तगत केल्या आहे.

थाई करी पेस्ट

लेखक स्वाती२ यांनी गुरुवार, 22/10/2009 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
थाई करी पेस्ट थाई करी पेस्ट ही दोन प्रकारची असते. रेड आणि ग्रीन. आपल्याकडे जसे प्रत्येक घरच्या मसाल्यात थोडा फार फरक असतो तसेच या पेस्टचे. यातील काही जिन्नस भारतात मिळायची शक्यता कमी तेव्हा त्याला पर्यायही देतेय. रेड करी पेस्ट ५ लाल सुक्या मिरच्या, चिरुन १ १/२ टे. स्पून शॅलोट ( लाल कांदा चालेल, लसूण थोडा जास्त वापरायचा), चिरुन १/२ टे. स्पून अगदी बारीक चिरुन लेमन ग्रास म्हणजे आपला गवती चहा असतो त्याचा फक्त दांडा १/२ टे. स्पून लसूण, बारीक चिरुन १ टी स्पून बारीक चिरलेले गलांगल( आले चालेल) १/२ टी स्पून बारीक चिरून लिंबाची फक्त साल(lime zest) .

[गणित!]

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 22/10/2009 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी जालावर फिरताना "केश्या" स्वतःशीच म्हणाला, "(गणित),दहाजणीत!,((गणित)) 'अगणीत>' , (झिरो) - ही, विडंबनं की अकाव्य?" काही समजेना झालं तेव्हा, पुन्हा फुटलेला एक कंड निवृतीकडून लेखनाकडे झेपावला... *** लेखणी सरसावून उतरताना जालावर पाहिलं त्यांन तेव्हा'गणित!' तही त्याला एक अर्थ दिसला... दिसणं, आणि असणं

(झिरो)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 22/10/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
ही प्रेरणा! किचकट गणित सोडवताना ती स्वतःशीच म्हणाली, "बेरीज, वजाबाकी, वर्ग, लॉग्ज - शून्य, पूर्णांक का अपूर्णांक?" गणित सुटेनासं झालं तेव्हा घरून आलेली हाळी ऐकून पुस्तकं टाकून स्टुडीओत पळाली ******************* कपडे आवरून ठेवताना मॅगझिनकडे पाहिलं तिनं तेव्हा शून्यातही तिला एक आव्हान दिसलं मॉडेल्स आणि हिरॉईन्स या दोन्हीतले फरक समजून ती कष्टली पावर योगा रोज करत शून्यावर आली तेव्हा तिच्याकडेच पहात तो म्हणाला "राणी कशी गोंडस हवी!"

<अगणीत>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 22/10/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा... न सांगताही समजला असालच... अगणीत!
काव्यरस

((गणित))

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 22/10/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
अशा गणितांची प्रेरणा सांगायलाच हवी का? :? गच्च मीटिंगमध्ये शिरताना तो स्वतःशीच म्हणाला, "डॉक्यूमेंट्स, मॉडेल, पॉवरपॉइंट, स्प्रेडशीट, स्लाईड्स - सगळ्या, अपूर्ण की पूर्ण?" प्रेझेंटेशन जमेनासं झालं तेव्हा, टकल्यानं टाकलेला एक कटाक्ष पुढल्या वादळाची नांदी देणारा... *** लॅपटॉप बंद करुन क्यूबमध्ये परतताना टेबलवर पाहिलं त्यानं तेव्हा कागदाच्या ढिगातही त्याला 'त्याचं' अक्षर दिसलं... इंजिनिअर, आणि मॅनेजर या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत मान त्यानं ती नोट वाचली तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती म्हणाली, "०/१०!" रचना : गणित चुकल्यानंतर २००८
काव्यरस