Skip to main content

२६/११ : एक पाशवी आगळीक

लेखक गिरीश कुळकर्णी यांनी गुरुवार, 26/11/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
************************************* ************************************* नेहमी सामान्यांचे रक्त सांडती तो प्रकार पाशवी "दुनियापर राज करेंगे"घुमटांचा प्रचार पाशवी कैसी मनोगते ही कैसाच हा राक्षसी कांगावा सुरु इथेच येऊन आमच्याच शांततेचा संहार पाशवी धर्मासाठी सर्वस्व द्यारे,अबोध फसती कांगाव्याला सहीष्णुतेवर पोसल्या जाणत्यांचे होकार पाशवी अजाण-सुजाण सारेच झालेत मांडलीक जगभर चोहीकडून नासल्या बौद्धीकांचा भडीमार पाशवी माणसांची स्मशानेच व्यापतील अर्धी पृथ्वी अशाने शस्त्राने जग बुडवणार्‍या धर्माचा यल्गार पाशवी ज्यांचे आयुष्यच जणू काही फुटकळ नोंदी, त्यांना अफुच्या गोळ्या वाटण्याच

मदत :- अंगातील आळस कसा घालवू?

लेखक शाहरुख यांनी गुरुवार, 26/11/2009 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी खरं तर हुशार आहे..पण हल्ली माझ्या अंगात असलेला आळस फारच वाढत चाललेला आहे..काही करायची हुशारी वाटत नाही..तरी समाधानकारक उपाय सुचवावा. (चिंतित) शाहरुख तळटीप - हा धागा इतर साहित्यिक धाग्यांत लुडबूड करतोय याची संपूर्ण जाणीव आहे..समस्येचे समाधान होताच मा. संपादक मंडळास धागा उडवणेसाठी विनंती केली जाईल.

२६ नोव्हेंबर विसरायचा नसेल तर आवर्जून पहावं असं काही

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 26/11/2009 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भष्टाचाराविरूद्ध महत्वाचे हत्यार ठरू शकणार्‍या माहिती आधिकाराच्या कायद्यानंतर त्याच्या काही यश-कथा वाचल्या, तसंच हेमंत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे यांच्या अतिरेक्यांद्वारा हत्येनंतर त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेट विषयीच्या चौकशीला मिळालेलं असं बेजबाबदार उत्तरही वाचनात आलं.

अर्जंट्ली रिक्वायर्ड - SQL/PLSQL

लेखक उमराणी सरकार यांनी गुरुवार, 26/11/2009 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, SQL/PLSQL कोडींग चे उत्तम ज्ञान असणारे आणि टेस्टींग व डेव्हलपमेंट चा अनुभव असणारे कोणी माहीत असल्यास कृपया संदर्भ द्या. कामाचे ठीकाण - हैदराबाद. कामाचे स्वरूप - कोर बँकींग सोल्युशन डेव्हलपमेंट. ई-मेल - umarani.amit@gmail.com आभार. अमित उमराणी.

(हिरवा माज)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 25/11/2009 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्रीताईंचा असला कचकचीत हाफवॉली पडल्यावर आमच्यातल्या विडंबकाने काय करावं असं अपेक्षित आहे? ;) ग्लेन्फिडिच बरसे सखा डॉलर पाऊस माज लेऊन हिरवा, येतो डॉलर पाऊस तिची प्रतिक्षा ग्लासात अन सख्याही फितूर गालागालात तोबरा, पिंकेपिंकेआड धूर पापड्-फर्साण चखणा तिथे पुरवतो सखा खुळावली मैफल माज घेऊन अनोखा मिरविते नवी नोट रंग कंच हो हिरवा पिंकसरीत भिजूनी लाल रंग गाली नवा नोटा उडती बाहेरी आटे खिसा धाकधुक दोस्त हलके उठती, घेती कलटी नाजुक बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!! चतुरंग
काव्यरस

(माजुर्डा डास)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 25/11/2009 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा जयवीताईंची सुंदर कविता हिरवा साज. गुणगुणतो चावतो पकवतो, घुसला घरात डास धडकी भरवतो मनात, तोचि एक डास प्रतीक्षा कसली करीशी, आहे जालिम इलाज हाती घेतली रॅकेट, मारायाची भारी खाज धडपडायचे मम डोहाळे, लपे तो निगरगट्ट मारायचे आज त्याला, लावा ऑल-आउट मिरवते द्रव आतले, बाटली ती भगवी वीज गेली, आली परी दैवगती आडवी शांत बसता दिला तयाला, एक फटका जोरकस हाय लागले "आई गं", नेम माझा हिणकस शोषिले रक्त माझे हळूच डाव साधून झोपावे आता तरी, गोधडी ही पांघरून
काव्यरस

मी मुंबई बोलतेय...

लेखक मड्डम यांनी बुधवार, 25/11/2009 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
-विकास शिरपूरकर ''मी मुंबई. कधी कुणी मला बॉम्बे म्हणायचं तर कुणी बंबई. त्याही आधी तर कधी मुंबा, कधी मुंबापुरी, कधी Bombaim तर कधी बंबई आणि Bombay. गेल्‍या तीन-चारशे वर्षांत मी अनेक बदल पचवले आणि रूचवले सुध्‍दा. म्हणूनच मला कुणी काय संबोधावं ही तक्रार घेऊन मी आलेलीच नाहीये. ही नावे बदलतानाच मी इतकी बदलून गेले की माझी मीच मला ओळखू येत नाहीये. पण हो मी कितीही बदलले असले तरी माझ्या वृत्ती मात्र तशाच आहेत, माझ्या लेकरांमध्येही त्या वृत्तीच सामावल्या आहेत.

प्रवास

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी बुधवार, 25/11/2009 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
एड्गर्ड अल्बर्ट गेस्ट यांची क्षमा मागून "मिस मी बट लेट मी गो" या त्यांच्या कवितेचा स्वैर अनुवाद - ------------------------------------------------------------------- मजसाठी जेव्हा वाट ही संपणार मावळेल भास्कर अन् होइल अंधार सोपस्कार नको मजला काळोखातिल का खंत करावी कुणी मुक्त झाल्यावर? मज स्मरा तुम्ही परि थोडक्याच वेळाला नच अश्रू ढाळा आणिक मज स्मरताना आठवा प्रेम जे दिले-घेतले आपण आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण हा प्रवास अपुल्या सर्वांना अनिवार्य एकटेच जाणे पुढे, संपता कार्य चालला ख

--चुकवू नये अशी मैफल--

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 25/11/2009 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित उदय भवाळकर (धृपद गायन) आणि उस्ताद बहाउद्दीन डागर (रुद्र्वीणा) यांची जुगलबंदी दि. ६ डिसेम्बर २००९ रोजी सकाळी ९ वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे देणगी प्रवेशिका पुढील आठवड्यात उपलब्ध होतील.

वार्धक्य

लेखक गिरीश कुळकर्णी यांनी बुधवार, 25/11/2009 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
************************ ************************ जगलो तुला घेऊन राजरोस आयुष्या का तुला अंधाराचा आता सोस आयुष्या बहरातले जीणे शिशिरातली गाणी झाली टाकलेस दान किती भरघोस आयुष्या सवेच फिरलो झिंगलो नाचलो खेळलो घातला मनस्वीच ऐसा हैदोस आयुष्या खेळलो सगळेच डांव अन निर्ढावलोही तिथे असायचास आता नसतोस आयुष्या आता मोजकाच उरलो ओळखुन आहे श्वासांचे इमले झाले रे ओस आयुष्या अतृप्तीची काहाणी नव्याने लिहून पाहू वार्धक्याचा नको रे अफसोस आयुष्या अमर्याद तुझा संग हवा ही आंस नाही पण अंक शेवटाचा हवा ठोस आयुष्या ************************* *************************