Skip to main content

वार्धक्य

लेखक गिरीश कुळकर्णी यांनी बुधवार, 25/11/2009 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
************************ ************************ जगलो तुला घेऊन राजरोस आयुष्या का तुला अंधाराचा आता सोस आयुष्या बहरातले जीणे शिशिरातली गाणी झाली टाकलेस दान किती भरघोस आयुष्या सवेच फिरलो झिंगलो नाचलो खेळलो घातला मनस्वीच ऐसा हैदोस आयुष्या खेळलो सगळेच डांव अन निर्ढावलोही तिथे असायचास आता नसतोस आयुष्या आता मोजकाच उरलो ओळखुन आहे श्वासांचे इमले झाले रे ओस आयुष्या अतृप्तीची काहाणी नव्याने लिहून पाहू वार्धक्याचा नको रे अफसोस आयुष्या अमर्याद तुझा संग हवा ही आंस नाही पण अंक शेवटाचा हवा ठोस आयुष्या ************************* *************************
लेखनविषय:

वाचने 1854
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुरूवात वाचल्यावर शेवट असा असेल असं वाटलं नाही, पण शेवट आवडला; त्यामुळे कविताही. अदिती

In reply to by मदनबाण

तेच म्हणतो. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी

सुंदर कविता अवांतरः हे "आयुष्या" सारख आणखी कुठेतरी वाचल्याचं आठ्वतयं अतिअवांतरः कच्चा माल बरा सापडला ;)