मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास

प्रशांत उदय मनोहर · · विशेष
एड्गर्ड अल्बर्ट गेस्ट यांची क्षमा मागून "मिस मी बट लेट मी गो" या त्यांच्या कवितेचा स्वैर अनुवाद - ------------------------------------------------------------------- मजसाठी जेव्हा वाट ही संपणार मावळेल भास्कर अन् होइल अंधार सोपस्कार नको मजला काळोखातिल का खंत करावी कुणी मुक्त झाल्यावर? मज स्मरा तुम्ही परि थोडक्याच वेळाला नच अश्रू ढाळा आणिक मज स्मरताना आठवा प्रेम जे दिले-घेतले आपण आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण हा प्रवास अपुल्या सर्वांना अनिवार्य एकटेच जाणे पुढे, संपता कार्य चालला खेळ हा मोठ्या दरबारातिल जाण्यासाठी स्वगृही एक हे पाउल एकाकी वाटुन मन होता कधि हळवे भेटण्या सोयर्‍यासग्यांस तेव्हा जावे अश्रु सुकवा त्यांच्यात प्रेम वाटून आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण -------------------------------------------------------- (या कवितेत गदिमांच्या जोगियामधलं मात्रागणवृत्त वापरलंय.)

वाचने 3952 वाचनखूण प्रतिक्रिया 2

शुचि 13/02/2010 - 11:31
कवितेला आपण न्याय दिला आहे. मी "मिस मी बट लेट मी गो" वाचली आणि समृद्ध झाले. कधीतरी "शी वॉक्स इन ब्युटी लाइक द नाइट" च येऊ द्या. :) ....... अपेक्षा वाढल्या आहेत. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विसोबा खेचर 13/02/2010 - 11:33
मज स्मरा तुम्ही परि थोडक्याच वेळाला नच अश्रू ढाळा आणिक मज स्मरताना आठवा प्रेम जे दिले-घेतले आपण
वा! तात्या.