Skip to main content

अवांतर प्रतिसादांबाबत...

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी गुरुवार, 03/12/2009 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, गेले काही दिवस मिपावर अवांतर प्रतिसादांची, मूळ धाग्याशी/विषयाशी काहीही संबंध नसणारे-केवळ एकमेकांशी वायफळ व फालतू गप्पा मारणार्‍या वैयक्तिक स्वरुपाच्या प्रतिसादांची, एखाद्या धाग्याला सार्वजनीक खरडफळ्याचे स्वरूप देऊन त्या धाग्याचा विचका करणार्‍या प्रतिसादांची संख्या बरीच वाढली आहे असे दिसते.. सबब, आज दिनांक ३ डिसेंबर, २००९ - भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १-३० वाजल्यापासून असा वटहुकूम जारी करण्यात येत आहे की वरील स्वरुपाचे अवांतर प्रति

(शेवट)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 03/12/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा बेसनलाडू यांची सुंदर गझल शेवट भात मी असा हाती घ्यावा..खाता खाता ओघळ अन तेव्हाच गळावा..खाता खाता सोबत घेतो तूप वरण अन लिंबू मी ही असा रोज सहभोज घडावा..खाता खाता रोज असा हा पंगतीमध्ये बेत बनावा बोटांवरती स्वाद उरावा..खाता खाता एक घास ही पुढे मला खाता ना यावे अग्रह हा इतका न करावा..खाता खाता खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो मुखशुद्धीला विडा मिळावा..खाता खाता तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर डुलकीने या शेवट व्हावा..खाता खाता

शेवट

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 03/12/2009 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता एकवारही मागे तुज बघता ना यावे? इतका का दुस्वास करावा..जाता जाता? चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली मागमूस याचा न उरावा..जाता जाता दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
काव्यरस

घोडचुक..

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 03/12/2009 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
टारुभाऊंच्या विनंतीला मान देऊन साभार... १० वीची परीक्षा संपली आणि वारं प्यालेल्या खोंडागत आमचा कंपु ( मी, भेम्या, बैल, विव्या, प्रण्या) ऊधळला. मी रहायला कसबा पेठेत आणि बाकी सारे मैतर शनिवारातले.. सकाळची पहीली भेट ७ वाजता वाड्याच्या पटांगणात .. तेथे आत्ता सारखी प्रेमवीरांसाठी राखुन ठेवलेली हीरवी कुरणे नव्हती, होते मोकळे मैदान, सायकलचे पहिले धडे तिथेच गिरवले. तर त्या पटांगणात आम्ही सुर्य डोक्यावर येईस्तोवर मनोसक्त चेंडुफळी खेळायचो. विव्याचे आई-वडील बँकेत, त्यामुळे त्याचे घर म्हणजे आमचा खास अड्डा बनला होता.

एक मुक्तक.

लेखक रामदास यांनी बुधवार, 02/12/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
अहो, पोर किंचाळत उठली राफा --राफा म्हणत, घोर लागला मला मेलीला. (पण ) तुम्ही आपले घोरत होतात. मला मेलीला (पण ) स्वप्न पडतात भलती सलती. पोर किंचाळत उठली आणि तुम्ही आपले तोंड उघडून.. (श्शी बाई!

न्युयॉर्क

लेखक प्रभो यांनी बुधवार, 02/12/2009 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
"भे**...मी NY ला येतोय या थँक्सगिविंगच्या सुट्टीला.....आयेगा नं तू मिलने???" ऑफिसमधला एक जुना मित्र जो आता दुसर्‍या कंपनीत आहे तो जीमेलवर बोलत होता. शेवटची भेट झालेली दीड वर्षापूर्वी....त्याच्या अमेरिकेला जाणार म्हणून दिलेल्या पार्टीला... ईकडे रूमपार्टनर्स आणी बाकिच्या मित्रांचा वॉशिंग्टन डी सी आणी अटलांटीक सिटी ला जायचा प्लान फिसकटला.. म्हणून मग न्युयॉर्क ला जायचं ठरवलं..आधीचा विकांत पण एका मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी न्युयॉर्कची नाईट लाईफ हुंगण्यात गेला होता. यावेळेस काही प्रसिध्द ठिकाणं पाहण्याचे ठरवले.. थँक्सगिविंग डे ला न्युयॉर्कचे एक आकर्षण असते ते म्हणजे मेसीची थँक्सगिविंग डे परेड.

(अवांतर)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 02/12/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्यांच्या विडंबनाची कीर्ती पाहून अर्थातच मत्सर निर्माण झाला. अवांतराने धागा भरला चांदण्या मात्र गायबल्या वैतागाने धुसफुसणारा नवा मिपाकर मी पाहिला घसरले बोल गप्पांवर कैच्याकै कंपू बरळला थांबले मिपा पळभर पाहता लेखकू कोमेजला "जियो जियो" प्रतिसादावर सहमतीचा नाद गुंजला वेड्यांचा हा बाजार पाहून मालक मात्र हिरमुसला "ठेवा गप्पा खरडींपुरत्या व्यनिची सोय केली कशाला? जायचे तर खुशाल जावे कोल्हापूरच्या प्रसिद्ध चपला!"
काव्यरस

भोपाळ

लेखक विकास यांनी बुधवार, 02/12/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
* भोपाळ, ३ डिसेंबर १९८४: रात्रीचे चे साधारण ९:०० वाजले होते. कारखान्यातील पाण्याच्या नळ्या साफसफाईकरण्यासाठी चालू करण्यात आल्या. वास्तवीक त्यानी वरवरच साफ होणे अपेक्षित होते. पाणि हे काँक्रीट्च्या आत बसवलेल्या मेथील आयसोसायनाईटच्या टाकीत जाणे अपेक्षित नव्हते. तरी देखील तसे गेले. मेथील आयसोसायनाईट आणि पाणि एकत्र आल्याने होणारी रासायनीक प्रक्रीया ही उर्जेस जन्म देते. तो अपवादविरहीत रासायनीक नियम आहे आणि तसेच झाले.