मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवट

बेसनलाडू · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता एकवारही मागे तुज बघता ना यावे? इतका का दुस्वास करावा..जाता जाता? चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली मागमूस याचा न उरावा..जाता जाता दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता

वाचने 3927 वाचनखूण प्रतिक्रिया 17

In reply to by पिवळा डांबिस

सहज गुरुवार, 12/03/2009 - 12:01
>हा प्रेमाचा ४था पोपट दिसतोय!!! हा पहा चौथा राघू तोता तोता वाहत्या गंगेत भिजला जाता जाता

In reply to by पिवळा डांबिस

टारझन गुरुवार, 12/03/2009 - 12:02
=)) =)) कविता मात्र सुरेख .. मात्रा वेलांटी वगैरे .. तशीही इकडे खोट काढायला जागाच नसते म्हणा :) - (मात्रा बद्ध) पोपटलाडू गुरू-लघु-लगु-गुरू-गुरू

प्रभो गुरुवार, 12/03/2009 - 20:30
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धनंजय गुरुवार, 12/03/2009 - 20:38
गझल आवडली. **(पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी द्विपदी -या विशेष आवडल्या.)**

उमराणी सरकार गुरुवार, 12/03/2009 - 20:49
---दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता---- झक्कास. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

विसोबा खेचर गुरुवार, 12/03/2009 - 23:29
मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
अतिशय सुरेख..! तात्या.

ऋषिकेश Fri, 12/04/2009 - 12:45
लै भारी! ४था व शेवटाचा शेर विषेश आवडला ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

हर्षद आनंदी Fri, 12/11/2009 - 00:13
दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता ये जीवन है.. इस जीवन का यहीं है रंगरुप आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..