एक मुक्तक.
अहो,
पोर किंचाळत उठली
राफा --राफा म्हणत,
घोर लागला मला मेलीला.
(पण )
तुम्ही आपले घोरत होतात.
मला मेलीला
(पण )
स्वप्न पडतात भलती सलती.
पोर किंचाळत उठली
आणि तुम्ही आपले तोंड उघडून..
(श्शी बाई! अजूनही लाळेची तार उशीवर.)
तर मी सांगत होते क्काय...
तो कावळा मेला बंद झाला.
पूर्वी डोळा लागला
की चंद्र दिसायचा
आणि हा मेला त्या चंद्रावर.
आताशा कुठे गेला काय ठावकी
(पण)
पोर किंचाळत उठली ...
तुम्ही आपले..
(आणि)
मला सांगा हो तुमची स्वप्नं,
आधी कसं तुम्ही सांगायचात
मी आले तुमच्या स्वप्नात.
खोटं मेलं सगळं
(पण)
तुमचं तोंड
(बघतेय आजकाल मी!)
झोपेतच उघडतं.
पोर किंचाळत उठली
(आणि)
मी हाका मारतेय तुम्हाला.
(मेलं दचकायचं काय येवढं.)
आणि काय पण ध्यान .
एक हात तिथे
(आणि )
दुसर्या हातात ब्रह्मगाठ.
| लेखनविषय: |
|---|
याद्या
5800
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोळतोय!
एका हात
उत्तम!
संदर्भांसहित
हेच
In reply to संदर्भांसहित by श्रावण मोडक
हेच म्हणतो
In reply to हेच by सहज
दुर्बोध?
In reply to संदर्भांसहित by श्रावण मोडक
जोरदार
नदाल
अॅब्स्ट्
पुन्हा षटकार...
ऑब्सेसिव्
हॅ हॅ हॅ
छान छान
एक हात
प्रणाम
दुर्बोध!!!
_/\_
उत्तम मुक्तक
???
???