Skip to main content

गीत रामायण- बाबुजी आणि गदिमांचे

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 27/12/2009 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यश्लोकी जे मुनी वाल्मीकी गदिमा होऊन आले लोकी लाख मनांना वेड लाविती बाबुजी रामायण गाती नित्य उपासक ते प्रतिभेचे भाविक पूजक स्वर-शब्दांचे चरित सांगती जगतपित्यचे तारे हे सूर्या ओवाळिती बाबुजी रामायण गाती हे भक्तीचे कोरीव लेणे कोजागिरीचे धवल चांदणे ह्रद्यकुपीतून आले गाणे संगती लाखो जन रंगती बाबुजी रामायण गाती फुलापरि ते शब्द उमलती सुगंध पसरे विश्वाभोवती इतुके याचे वेड लाविती नास्तिका भक्ती रस पाजती बाबुजी रामायण गाती पूर्णपणाची कृतार्थ चौकट कसे जगावे पुरुषोत्तमपट विस्मयकारक अतिव उत्कट ऐकुनी श्रोतुजन नादती बाबुजी रामायण गाती मुग्ध जाहले लाखो जनमन तृप्त म
काव्यरस

ल्यापटाप घ्यायला सल्ला हवाय

लेखक साधामाणूस यांनी शनिवार, 26/12/2009 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवीन laptop घ्यायचा विचार आहे. जाणकार मदत करतील काय? बजेट : रू. ३०,००० ते रू. ३५,०००. सम्भाव्य वापर : कार्यालयीन काम (Presentations, लिखाण, आंतरजालावरून आवश्यक ती माहिती गोळा करणे) इतर गोष्टी दुय्यम आहेत. HCL, HP, DELL, SONY व SAMSUNG brands मधील योग्य पर्याय असावा.आन्तरजालावर HCL व HP विषयी काही नकारात्मक प्रतिसाद बघायला मिळाले. अन्यथा hp compaq core 2 duo (610 VB) आणि HCL ME 4110 मधील एक निवडायचा होता. धन्यवाद! -साधा माणूस

बंदोबस्त

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 26/12/2009 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
सुपातली पाखड अंगणात भिरकावून भुलवतेस चार भुरट्या पाखरांना भर दुपारी. गुमसुम गुपचुप. आतून बंद कडी घालतेस दुपारच्या अधमुर्‍या अंधाराची. खिडकी आड भोचक राघू किंचाळतोच, माहीत्येय .. ....... माहीत्येय.. दुपारची दंगल आणि बाहेर बंदोबस्त.
काव्यरस

चित्रपट परीक्षण-"अवतार"

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 26/12/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट परीक्षण- अवतार जगभरातून अवतार या हॉलिवूड चित्रपटाचे प्रेक्षकांकडून स्वागत होते आहे. समीक्षक सुद्धा या चित्रपटाला पसंत करत आहेत. उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड त्याने तोडले आहेत. अर्थात भारतात सुद्धा.

मागणे

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 26/12/2009 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेने अनवाणी जाता ,केला मी इतरांचा हेवा मनात म्हटलं " साधी तरि चप्पल मला दे रे देवा" .... .. पाय घातला चपलेत आणि वाटलं आता जिंकलं जग चप्पल मात्र जुनी पुराणी वाटु लागली लगेच मग म्हटलं "आतi नवीन हवी,सुन्दर आणि सुखदायी तेवढं जर दिलंस देवा आणखी काही मागणार नाही" ........... ते ही मिळालं मग वाटलं एक आता पुरत नाही अजुन एक,अजुन एक हौस काही भागत नाही. हे हवं ..ते ही हवं.. मिळवुन ना तर खेचुन घ्यावं जगामधलं सारं सुख माझ्या पायाखाली हवं उरापोटी धावुन शेवटी, केलंच सारं जमा भोवती पर्वाच केली नाही जरी, तुटली सारी नाती-गोती ..........
काव्यरस

मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 26/12/2009 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. रोज रोज गा-हाणे मित्र ऐकून ऐकणार काय ? भर दुपार मैफल माझी साकी कोणी सजवत नाही .. ढगाळ दुपार ओसरून सांज त्यावर कलताना .. रिता पेला रिते मन घेउन गाणे म्हणताना ... मीच मला संगतीला ताल कोणी धरत नाही .... उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... -- सागर लहरी ३/८/२०0९

कशाला ?

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 26/12/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र शत्रु सर्व जमले, अन्त्य यात्रेला कशाला ? विसरले सारे मला ते, व्यर्थ मग रडले कशाला ? प्राक्तनाची सर्व नाट्ये , रंगुनी मी खेळलो , खेळ तो खोटाच होता, जिंकुनी मिरवू कशाला ? वेदनेची सर्व गाणी, मीही होती गायिली, भैरवीचे आज गाणे, मी उगा गाऊ कशाला ? -- सागर लहरी १९-१२-२००९

येई येई गा मुकुंदा | जगज्जीवन परमानंदा |

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 26/12/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
येई येई गा मुकुंदा | जगज्जीवन परमानंदा | आम्ही तुझ्या नामछंदा | वेडावलो || तुझिया मायेपासून राही | जगी ऐसे काही नाही | भक्त तुझा सावध पाही | माया मोहा || भवसागरी अफाट जळ | काम लोभाचे नित्य खेळ | तरण्या यातून द्यावे बळ | आम्हा लागी || हवेपणाची हाव तोडी | नकोपणाही तैसा सांडी | नाम किर्तना करुनी होडी | तरावया || नाम तुझे जपे मुख | सदा होय जिव्हे सुख | डोळीयाना होय दुःख | अपार की || जिव्हे तुजला मिळतो हरी | नामजपे या संगत करी | वंचित आहो आम्ही परी | दर्शनासी || घेत नाम देव राया | धरुनी संता तरेन माया | परि या नेत्रा सुखी कराया | दर्शन देई || - सागर लहरी २५.१२.२००९

मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 26/12/2009 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका (लेखाचा हेतू केवळ मराठी अस्मितेचाच आहे. परप्रांतीय, नोकर्‍या, राजकारण असली गल्लत न करता वाचावा) मराठी अस्मितेच्या मुद्याला आत्ता राज ठाकरेंनी हातात घेतल्याने उभारी आली आहे. त्या आधी शिवसेनेने हे काम केले होते. नंतरच्या काळात शिवसेना आपल्या मुळ मुद्यांपासून भरकटली. त्यानंतर कोणीही मराठीचा मुद्दा हातात घेतलेला नव्हता. राजकारणी लोक केवळ वारा आला तशी पाठ फिरवणारे व सत्तेत येण्याची वाट पाहणारे असतात ही आताशा काळ्या दगडावरची रेख झालीय. त्यात मराठी अस्मितेचा अगदीच नेभळट होता. विदर्भात मराठीच बोलली जाते.