Skip to main content

मागणे

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 26/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेने अनवाणी जाता ,केला मी इतरांचा हेवा मनात म्हटलं " साधी तरि चप्पल मला दे रे देवा" .... .. पाय घातला चपलेत आणि वाटलं आता जिंकलं जग चप्पल मात्र जुनी पुराणी वाटु लागली लगेच मग म्हटलं "आतi नवीन हवी,सुन्दर आणि सुखदायी तेवढं जर दिलंस देवा आणखी काही मागणार नाही" ........... ते ही मिळालं मग वाटलं एक आता पुरत नाही अजुन एक,अजुन एक हौस काही भागत नाही. हे हवं ..ते ही हवं.. मिळवुन ना तर खेचुन घ्यावं जगामधलं सारं सुख माझ्या पायाखाली हवं उरापोटी धावुन शेवटी, केलंच सारं जमा भोवती पर्वाच केली नाही जरी, तुटली सारी नाती-गोती .......... सगळ्या सुखात आहे एकटा, निर्जीव भिंती, निर्जीव वाटा ढिगभर सुंदर चपलांमधे बुडुन गेलो आहे पुरता ............... आता मात्र हाव नाही, खरंच सांगतो नको काही चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2253
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मुक्तक फार आवडलं... :) चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित... क्या बात है | मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

In reply to by मदनबाण

आवडली मुक्तकविता......:-) (बूटोबा) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)

खूपच सुंदर कविता! ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

फुलवा, अंतर्मुख करून गेली कविता. हा आपलाच आपल्याशी असणारा झगडा अनादि आहे आणि अनंतही. जोवर माणूस आहे तोवर हे चालूच राहणार. बरं हे कळत नाही असं आहे का? तर तसंही नाही, कळतं सगळं, सगळ्यांना... वळत नाही बहुतेकांना एवढंच. बिपिन कार्यकर्ते

नेहमी प्रमाणेच नितांत सुंदर व अर्थपुर्ण कविता. आवडली हे सांगने ना लागे. किती हव्यास असतो नै, मला हे हवे मला ते देखील हवे... मला सुर्य हवा मला चंद्र ही हवा.. पळताना पडते भुई कमी.. सावली देखील सुटते पाठी मागे... थांबा हा नसतोच, जीव निघतो अर्धावरी... तरी हव्यास असतो नै.. मला हे हवे मला ते देखील हवे.. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

खुपच सुंदर कविता, अंतर्मुख करुन गेली. वर राजे आणी बिकानी त्यात अजुन भर टाकली. --टुकुल

आता मात्र हाव नाही, खरंच सांगतो नको काही चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित... हि वाक्यं तर अक्षरशः मनाला भिडली. देवा ! अरे काय रे ही गत केलीस. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

आवडली कविता. -दिलीप बिरुटे