मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बंदोबस्त

विनायक प्रभू · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सुपातली पाखड अंगणात भिरकावून भुलवतेस चार भुरट्या पाखरांना भर दुपारी. गुमसुम गुपचुप. आतून बंद कडी घालतेस दुपारच्या अधमुर्‍या अंधाराची. खिडकी आड भोचक राघू किंचाळतोच, माहीत्येय .. ....... माहीत्येय.. दुपारची दंगल आणि बाहेर बंदोबस्त.

वाचने 3542 वाचनखूण प्रतिक्रिया 16

चतुरंग 26/12/2009 - 21:10
नाताळच्या जरा जास्तच बैठका जमल्या होत्या की काय एवढ्यात? नाही म्हटलं, दुपारची दंगल वगैरे आठवायला लागलिये म्हणून विचारलं! ;) (राघू)चतुरंग

पाषाणभेद 26/12/2009 - 22:04
आजकाल थंडीचा कडाका पडलाय जास्त. दुपारच्याला पन गोधडी घ्यावी लागतेय. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

शाहरुख 27/12/2009 - 00:29
धोरण आवडले.. मोडकजी, राघूही 'माहित्येय' म्हणतोय म्हणजे कथा काय निदान कादंबरी तरी असणारच ;-)

In reply to by शाहरुख

श्रावण मोडक 27/12/2009 - 10:41
मोडकजी, राघूही 'माहित्येय' म्हणतोय म्हणजे कथा काय निदान कादंबरी तरी असणारच! हाहाहाहाहा... खरंय. हा स्केल लक्षात आला नाही.

अवलिया 27/12/2009 - 12:12
श्री रा रा विनायकजी प्रभुजीसाहेब आपण अंमळ चळलेले आहात. काळजी घ्या. वाढलेला रक्तदाब हृदयावर ताण देईल आणि अचानक आलेली उचकी पंचप्राण कंठाशी आणेल. आम्हाला (पक्षी - मिपाकरांना या अर्थाने ) तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे, त्याकरता आपले आचरण संयमित असु द्या. धन्यवाद. --अवलिया

मास्तर... एकदम नवकवितेच्या अंगाने व्यक्त व्हायला लागलात? !!! जरा जपून बरं का... नवकवितेला कसलाच धरबंध नसतो आय मीन... मात्रा वृत्त गण वगैरे... तेव्हा वहावत जायचीच शक्यता जास्त. तेव्हा जपून. बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश 28/12/2009 - 20:04
भर दुपारी.... (जल्ला नातालची सूट्टी कं ?) आतून बंद कडी घालतेस (ऊगडी कडी कशी घालाची ?) किंचाळतोच, (बर बर) दुपारची दंगल (तूज वय कती तू बोलतो कती ?) आणि बाहेर बंदोबस्त. ( मंग 'हात' कडी) खी खी खी मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

In reply to by ब्रिटिश

प्रभो 28/12/2009 - 20:29
दादूस....__/\__ --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by ब्रिटिश

धमाल मुलगा 28/12/2009 - 20:41
मास्तरची कविता ड्येंजर तर ह्या जल्ल्या दादुसचा प्रतिसाद महा ड्येंजर! धा मिंटं झाली दादुस, नुसता येड्यासारका हासतोय की रं मी!!!

विजुभाऊ 29/12/2009 - 12:56
मास्तर बारामती वाल्याना कळ्ळी तुमची कविता पण जरा आमच्या सारख्य आल्पमतीवाल्याना कळेल अशी ल्ह्या की नायतर ही तुमची कविता एक्षप्लेण कर्रा तुमच्या ष्टायलीत

jaypal 29/12/2009 - 18:55
आमस्नी येकच बंदोबस्त ठावा हाय. तुमचा कंचा बर? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/